‘शूल’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये दिग्दर्शनाची सुरुवात करणारे ई. निवास लवकरच ‘शूल 2’चे दिग्दर्शन करणार आहेत. मनोज वाजपेयीशिवाय हा चित्रपट बनवणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 1999 मध्ये रिलीज झालेल्या शूल या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. बिहारच्या एका लहानशा गावातील कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. चित्रपटात मनोज वाजपेयी एका धाडसी पोलीस अधिका:याच्या भूमिकेत होता. हा चित्रपट रामगोपाल वर्मा यांनी बनवला होता. आता तब्बल 15 वर्षानंतर ई. निवास या चित्रपटाच्या सिक्वलची तयारी करीत आहेत. ते म्हणाले, अद्याप आमचे काम पहिल्याच टप्प्यात आहे. मी सध्या पटकथा लिहीत आहे. आम्ही शूटिंग केव्हा सुरू करू ते मात्र मी सांगू शकणार नाही. मनोजशिवाय मी या चित्रपटाची कल्पनाही करू शकणार नाही.