Join us

'गेल्या २० वर्षांपासून मी काम करत असूनही...', सिनेइंडस्ट्रीतील घराणेशाहीवर प्रिया बापट स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 10:38 AM

Priya Bapat : पहिला ब्रेक मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागल्याचे प्रिया बापटने म्हटले.

अभिनेत्री प्रिया बापट(Priya Bapat)ची नुकतीच बहुचर्चित वेबसीरिज सिटी ऑफ ड्रिम्स ३ (City Of Dreams 3) वेबसीरिज प्रदर्शित झाली. राजकीय ड्रामा असणाऱ्या या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यानंतर आता तिची रफूचक्कर (Rafuchakkar) ही हिंदी वेबसीरिज भेटीला येणार आहे. दरम्यान प्रिया बापटने सिनेइंडस्ट्रीतील नेपोटिझमवर भाष्य केले आहे. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बापटने कलाविश्वातील घराणेशाहीवर आपले मत व्यक्त केले. ती म्हणाली की, मी नेपोटिझमकडे खूप वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. मला वाटते की, अभिनयाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील मुले सिनेइंडस्ट्रीत येऊ इच्छितात किंवा त्यांना जे ब्रेक देण्यास तयार आहेत अशांना प्रश्न विचारणं अयोग्य आहे. साहजिकच मला माझा संघर्ष व प्रवास आणि त्यांचा प्रवास यात तफावत दिसते. माझ्यापेक्षा त्यांना खूप वेगाने संधी मिळते. घराणेशाहीतील कलाकारांना संधी जास्त मिळते हे खरे असले तरी मला वाटते की ज्यांच्याकडे टॅलेंट आहे तो जास्त टिकून राहील. माझा प्रवास केवळ माझ्या अभिनयावर अवलंबून आहे. 

मला खूप स्ट्रगल करावा लागला...

प्रिया पुढे म्हणाली की, पहिला ब्रेक मिळवण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावा लागला होता. गेल्या २० वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत असूनही ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मिळण्यासाठी मला खूप वेळ लागला. मागील वर्षापासून मी हिंदी इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. बाहेरच्या व्यक्तीला इकडे सेटल होण्यासाठी आणि ते कोण आहेत हे लोकांना कळण्यास आणि त्यांच्या टॅलेंटवर विश्वास ठेवायला वेळ लागतो. पण तो माझा स्ट्रगल आहे, त्यांचा वेगळा असेल. हे दोन वेगळ्या व्यक्तींचे दोन वेगळे प्रवास आहेत. 

टॅग्स :प्रिया बापट