Join us

'अलादीनः नाम तो सुना होगा' मालिकेला १ वर्ष पूर्ण, तर कलाकारांनी शेअर केल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 16:32 IST

अलादीन (सिद्धार्थ निगम) आणि यास्मीन (अवनीत कौर) यांची सुंदर प्रेमकथा, अलादीन, अम्मी (स्मिता बन्सल) आणि जिनू (राशुल टंडन) यांच्यामधील नाते, जिनीची गंमत आणि जफरच्या (आमीर दळवी) क्रूर योजना यांच्यामुळे हा शो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. 

छोट्या पडद्यावरील 'अलादीनः नाम तो सुना होगा' मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. वेगवेगळ्या रंजन कथानकामुऴे मालिकेने नुकतेच 1वर्ष पूर्ण केले. प्रेक्षकांना प्रत्येक वळणावर धमाल आणि आश्चर्याच्या प्रवासाला नेणारा हा शो एक वर्षापूर्वी प्रथम दाखवण्यात आला तेव्हापासून चाहत्यांचा अत्यंत लाडका ठरला आहे. या शोमध्ये प्रेक्षकांमध्ये नेहमीसारखा उत्साह कायम ठेवत असताना अलीकडेच मोठे बदल करण्यात आले. अलादीन (सिद्धार्थ निगम) आणि यास्मीन (अवनीत कौर) यांची सुंदर प्रेमकथा, अलादीन, अम्मी (स्मिता बन्सल) आणि जिनू (राशुल टंडन) यांच्यामधील नाते, जिनीची गंमत आणि जफरच्या (आमीर दळवी) क्रूर योजना यांच्यामुळे हा शो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. 

हा शो ऑन एअर १ वर्ष पूर्ण करत असताना 'अलादीनः नाम तो सुना होगा'च्या कलाकार आणि कर्मचाऱ्यांनी हे आनंददायी निमित्त एका विशेष कार्यक्रमाद्वारे साजरे केले. त्यांनी प्रेक्षकांचे त्यांचे सहकार्य आणि प्रेम यांच्यासाठी आभार मानले. अलादीनच्या भूमिकेत असलेल्या सिद्धार्थ निगमने सांगितले की, ''आमच्यावर या पूर्ण वर्षभरात अमर्याद प्रेमाचा वर्षाव करून आमच्या प्रेक्षकांनी आम्हाला आनंद दिला आहे.

त्यांच्यामुळेच आम्ही आमच्या प्रेक्षकांना आनंददायी ठरेल असे सर्वोत्तम साहित्य देण्याचा प्रयत्न करतो. 'अलादीनः नाम तो सुना होगा' या शोचा भाग होणे ही माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे आणि आमच्या प्रेक्षकांना अलादीन आणि आता अली या भूमिकांद्वारे मनोरंजन करताना मला खूप आनंद होत आहे. आम्ही या शोद्वारे आमच्या प्रेक्षकांना आनंदी ठेवून आणखी अनेक टप्पे पार करू शकू अशी मला आशा वाटते.'' 

अम्मीच्या भूमिकेतील स्मिता बन्सल म्हणाल्या की, ''हा टप्पा पार करणे ही या शोमागील संपूर्ण टीमसाठी एक अत्यंत आनंददायी बाब आहे, मग ती पडद्यावर असो किंवा पडद्याबाहेर. प्रत्येकाने हा शो चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी कायमच काहीतरी खास आणण्यासाठी खूप मेहनत केली आहे. माझा 'अलादीनः नाम तो सुना होगा'मधील प्रवास खरोखर सुंदर होता आणि मी या शोचा भाग होऊन प्रेक्षकांचे आणखी अनेक वर्षे मनोरंजन करण्यासाठी खूप उत्सुक आहे.''  

टॅग्स :अल्लादिन