Join us

रिप्ड जीन्सची सगळ्यांनाच चिंता, या रिप्ड शर्टबद्दल काय? अदनान सामीने शेअर केली मजेदार पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 11:27 AM

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या रिप्ड जीन्सबद्दलच्या विधानानंतर आता या मुद्यावर बॉलिवूड सिंगर अदनान सामी याचीही प्रतिक्रिया आली आहे.

ठळक मुद्देआजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे कसले संस्कार आहेत? असे विधान तीरथ सिंह रावत यांनी केले होते.

 उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या रिप्ड जीन्सबद्दलच्या विधानानंतर सोशल मीडियावर ‘रिप्ड जीन्स’ हा हॅशटॅग ट्रेंड करतोय. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या विधानाची तीव्र निंदा होतेय. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तीरथ यांच्या विधानावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. आता या मुद्यावर बॉलिवूड सिंगर अदनान सामी याचीही प्रतिक्रिया आली आहे. पण या वादावर अदनानने कधी नव्हे इतकी मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे टिष्ट्वट सध्या वेगाने व्हायरल होतेय.या टिष्ट्वटमध्ये अदनानने एका व्यक्तिचा फोटो शेअर आहे.

 शर्टच्या दोन बटणांच्या गॅपमधून त्याचे पोट दिसतेय आणि त्याच्यामागे रिप्ड जीन्स घातलेली एक मुलगी बसलेली आहे. हा फोटो शेअर करत अदनानने मजेदार पोस्ट लिहिली. ‘आपण सगळे याबद्दल चिंतीत आहोत, मग आपले याच्याशी काही देणेघेणे असो वा नसो. या रिप्ड शर्टबद्दल आपण चिंता व्यक्त करणार आहोत का?’ असे अदनानने लिहिले आहे.अदनानच्या या पोस्टवर लोक एकापेक्षा एक मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

 काय म्हणाले होते मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत? बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे कसले संस्कार आहेत? असे विधान केले होते.  तीरथ सिंह रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला होता.‘एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलेकी, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलेकी कुठे जायचेय? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असे नव्हते,’असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :अदनान सामी