दीया मिर्झा व वैभव रेखीच्या लग्नावर बोलली एक्स-वाईफ सुनैना; वाचा काय म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 10:40 AM2021-02-18T10:40:36+5:302021-02-18T10:43:08+5:30

पूर्वाश्रमीच्या पतीच्या लग्नानंतर तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

ex-wife sunaina rekhi reacts on vibhav rekhis wedding with dia mirza | दीया मिर्झा व वैभव रेखीच्या लग्नावर बोलली एक्स-वाईफ सुनैना; वाचा काय म्हणाली...

दीया मिर्झा व वैभव रेखीच्या लग्नावर बोलली एक्स-वाईफ सुनैना; वाचा काय म्हणाली...

googlenewsNext
ठळक मुद्देदीया मिर्झाचा पती वैभवची एक्स-वाईफ सुनैना ही सुप्रसिद्ध योगा इन्स्ट्रक्टर आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा गेल्या 15 फेब्रुवारीला बिझनेसमॅन वैभव रेखीसोबत लग्नबंधनात अडकली. दीयाचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झालाये. दीयाचा दुसरा पती वैभव हा सुद्धा घटस्फोटित आहे आणि एका मुलीचा पिता आहे. लग्नाआधी वैभव व दीयाने आपल्या नात्याची कोणाला कानोकान खबर लागू दिली नाही. साहजिकच त्यांच्या लग्नाची बातमी आली, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता वैभवची एक्स-वाईफ सुनैना हिने या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

दीया मिर्झाचा पती वैभवची एक्स-वाईफ सुनैना ही सुप्रसिद्ध योगा इन्स्ट्रक्टर आहे. पूर्वाश्रमीच्या पतीच्या लग्नानंतर तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. सुनैनानै वैभव व दीयाचे लग्न मोठ्या मनाने स्वीकारलेय,हेच या व्हिडीओवरून दिसते. 

‘होय, माझ्या पूर्वाश्रमीच्या पतीने दीयासोबत लग्न केले आहे. या लग्नानंतर अनेकांनी मला पर्सनल मॅसेज करून माझ्या व माझ्या मुलीची विचारपूस केली. तू ठीक आहेस का, समायरा (सुनैना व वैभवची मुलगी) ठीक आहे का? असे अनेकांनी मला विचारले. माझी चौकशी करून माझ्याबद्दल चिंता व्यक्त करणाºयांचे मी आभार मानते. मी एकदम ठीक आहे. केवळ ठीक नाही तर माझी मुलगी तर तिच्या डॅडीच्या दुसºया लग्नाबद्दल खूप एक्साइटेड आहे. मी या लग्नाचे काही व्हिडीओ पाहिलेत. यात समायरा आनंदाने फूलं उधळताना दिसतेय. आमची मुंबईत कोणतीच फॅमिली नाही. आता मुंबईत आमची फॅमिली वाढली आहे. कुटुंबात नव्या लोकांचे येणे नेहमी आनंददायी असते. समायरा तिच्या आई-वडिलांच्या लग्नात प्रेम बघू शकली नाही. आता या लग्नात तिला प्रेम पाहायला, अनुभवायला मिळेल, याचा मला मनापासून आनंद आहे. मी वैभव व दीयाला आनंदी सहजीवनासाठी शुभेच्छा देते,’ असे सुनैनाने म्हटले आहे.

वैभव रेखी हा प्रसिद्ध व्यवसायिक मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या पाली हिल परिसरात राहातो. वैभवचे देखील हे पहिले लग्न नाहीये. त्याचे पहिले लग्न योगा आणि लाईफस्टाईल कोच सुनैना रेखीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान दीया आणि वैभव एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. 

वडील जर्मन तर आई बंगाली असताना दीया मिर्झा का लावते मुस्लिम आडनाव? कारण आहे खास

दीया मिर्झाच्या लग्नाचा थाट; पाहा, विवाह सोहळ्याचे व्हिडीओ

Web Title: ex-wife sunaina rekhi reacts on vibhav rekhis wedding with dia mirza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.