सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लहान मुलांचा डान्स रियालिटी शो सुपर डान्सरचा चौथा सीझन छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे आणि ऑडिशन फेरीतच सादर झालेल्या अप्रतिम आणि अनोख्या नृत्य प्रतिभेने पेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या नृत्य प्रतिभेचे प्रदर्शन करतानाच स्पर्धकांनी आपल्या व्यक्तीगत पण प्रेरणादायक गोष्टी देखील सांगितल्या ज्या प्रेक्षकांच्या हृदयाला भिडल्या आहेत.
अरुणाचल प्रदेशच्या कोसुमने लोकांकडून खूप अपमान सहन केला आहे, त्याची ओळख आणि रूप यावरून त्याला टोमणे मारले जात असे. पूर्वी लोक त्याला याबद्दल हिणवत असत आणि तो त्यांना हे सांगून सांगून थकून गेला होता, की तो देखील याच देशाचा नागरिक आहे. परंतु, कोसुमने सुपर डान्सरची ऑडिशन दिल्यावर मात्र चित्र एकदम पालटले. अनेक लोकांनी त्यांचा संपर्क साधून त्याच्याबद्दल सहानुभूती आणि काळजी व्यक्त केली. कोसुमने देखील सांगितले की, त्याची शोमधल्या इतर स्पर्धकांशी मैत्री झाली आहे आणि इथे त्याला घरच्यासारखे वाटते आहे.
खास आपल्यासाठी कोसुमच्या आईने पोशाख आणला आहे हे समजल्यावर गीता कपूर खूप आनंदली. आपली भावना व्यक्त करताना ती म्हणाली, “मला वेगवेगळे पोशाख परिधान करायला आवडतात. अरुणाचल प्रदेशचा पारंपरिक पोशाख अगदी अनोखा आणि मोहक आहे. यातून त्या प्रदेशाची सदभिरुची आणि अलंकारांचे प्रेम व्यक्त होते. कोसुमच्या आईने माझी इच्छा पूर्ण केली!”