Join us  

‘हमाल दे धमाल’मध्ये कॅमिओसाठी अनिल कपूरने किती पैसे घेतले? जयवंत वाडकर खुलासा करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 12:07 PM

जयवंत वाडकर, विजय पाटकर आणि तुषर दळवी या मैत्रीच्या त्रिकुटाने 'लोकमत फिल्मी'च्या 'आपली यारी' या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी 'हमाल दे धमाल' चित्रपटाचे अनेक किस्से सांगितले. या चित्रपटात अनिल कपूर यांनी कॅमिओ करण्यासाठी किती मानधन घेतलं होतं, याचा खुलासाही जयंत वाडकर यांनी केला.

९०च्या दशकातील अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे हमाल दे धमाल. लक्ष्मीकांत बेर्डे, जयंत वाडकर, विजय पाटकर, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, निळू फुले अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. स्टारकास्ट, गाणी आणि कथा याबरोबरच 'हमाल दे धमाल' चित्रपट एका वेगळ्या कारणामुळेही चर्चेत होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने कॅमिओ केला होता. त्यामुळे या चित्रपटाची क्रेझ आणखीनच वाढली होती. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत जयवंत वाडकर यांनी याबाबत भाष्य केलं. 

जयवंत वाडकर, विजय पाटकर आणि तुषर दळवी या मैत्रीच्या त्रिकुटाने 'लोकमत फिल्मी'च्या 'आपली यारी' या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी हमाल दे धमाल चित्रपटाचे अनेक किस्से सांगितले. या चित्रपटात अनिल कपूर यांनी कॅमिओ करण्यासाठी किती मानधन घेतलं होतं, याचा खुलासाही जयवंत वाडकर यांनी केला. "हमाल दे धमाल चित्रपटात अनिल कपूरने कैमिओ करावा, अशी पुरषोत्तम बेर्डे यांची इच्छा होती," असं ते म्हणाले. 

पुढे त्यांनी सांगितलं, "या चित्रपटात काम करण्यासाठी आम्ही अनिल कपूर यांना विचारणा केली. त्यावेळी आमचा प्रस्ताव ऐकल्यानंतर त्यांनी लगेचच होकार कळवला. केव्हा करुया? असंही त्यांनी विचारलं. अनिल कपूर लगेच हो म्हणतील याची शक्यताही मला वाटली नव्हती. त्यामुळे या चित्रपटासाठी त्यांचा होकार येणं, हा माझ्यासाठी सुखद धक्का होता." 

१९८९मध्ये प्रदर्शित झालेल्या हमाल दे धमालसाठी अनिल कपूर यांनी किती मानधन घेतलं होतं, याचा खुलासाही जयवंत वाडकर यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत केला. "त्या माणसाने हमाल दे धमाल या चित्रपटासाठी एकही पैसा न घेता कॅमिओ केला होता. तशा प्रकारचं बाँडिंग किंवा नातं तुम्हाला आता पाहायला मिळणार नाही," असं ते म्हणाले. 

टॅग्स :अनिल कपूरमराठी अभिनेतामराठी चित्रपट