Join us

'महाराज माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...', प्रसिद्ध अभिनेत्यानं रायगडावरील खास व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 2:05 PM

हिंदी टीव्ही विश्वातील आघाडीचा चेहरा असलेला अंकित छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानतो.

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा (Shivaji Maharaj Jayanti) उत्साह १९ फेब्रुवारीला फक्त राज्यातच नव्हे तर सगळ्या जगभरात दिसून आला आहे. रयतेच्या स्वराज्याची उभारणी करणाऱ्या राजाला मानवंदना देण्यासाठी जगभरात शिवजयंती उत्साहाने साजरी झाली. शिवजयंतीनिमित्त सर्वसामान्य मंडळींसह अनेक सेलिब्रिटीदेखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच लोकप्रिय अभिनेता अंकित मोहननेरायगडावरील खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

हिंदी टीव्ही विश्वातील आघाडीचा चेहरा असलेल्या अंकित मोहननेरायगडाचा व्हिडीओ पोस्ट केला. यात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या हार घालताना दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहलं, 'तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी अंकित मोहन... महाराज, तुमच्या इच्छेनुसार तुमची पूजा करण्याचं सौभाग्य मिळालेला हा दिवस कधीच विसरू शकत नाही'.

त्याने लिहलं, 'मुरारबाजीच्या शुटिंगपूर्वी तुमच्या चरणांना स्पर्श करण्याची संधी मिळेल या आशेने मी तुम्हाला  भेटायला आलो होतो. तुम्हा मला त्यापेक्षा खूप काही दिलं आहेत. जे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकणार नाही. मी माझा आत्मा आणि माझे शरीर तुम्हाला समर्पित करतो. तुम्ही केलेले कार्य खऱ्या भक्तीभावाने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी माझे जीवन समर्पित करण्याचं वचन देतो. मी तुमचा मावळा आहे आणि मी स्वतःला तुमच्या स्वाधीन करतो'. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

अंकित हा दिग्पाल लांजेकरांच्या 'फर्जंद', 'पावनखिंड', 'फत्तेशिकस्त' आणि 'वीर मुरारबाजी' या चित्रपटांतही झळकला. प्रेक्षकांनीही त्याला या भूमिकांमध्ये पसंत केलं. अंकित छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानतो. त्याने त्याच्या हातावरही राजे असा टॅटू काढला आहे. अंकितनं अनेक मालिका आणि चित्रपटांत काम करून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. २०१५ साली त्याने मराठमोळी अभिनेत्री रुची सवर्णशी लग्नगाठ बांधली. त्यांना रुआन हा मुलगा आहे. अंकित 'वीर मुरारबाजी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :अंकित मोहनदिग्पाल लांजेकरसेलिब्रिटीछत्रपती शिवाजी महाराजरायगड