Join us

या व्हिलात झालंय दीपिकाच्या ‘Gehraiyaan’चं शूटींग, एका रात्रीचं भाडं ऐकून थक्क व्हाल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 13:04 IST

Gehraiyaan: ‘गहराइयां’ हा सिनेमा चांगला की वाईट यावर आम्ही बोलणार नाही. पण चित्रपटातील दोन गोष्टी मात्र लक्षवेधी आहेत. एक म्हणजे, दीपिकाचा अभिनय आणि दुसरी म्हणजे, चित्रपटातील लोकेशन्स. होय, चित्रपटातील समुद्राकाठी असलेल्या व्हिलाची तर बातच न्यारी.

दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) ‘गहराइयां’ (Gehraiyaan) या सिनेमानं रिलीज होण्याआधी चांगलीच हवा केली होती. कारण होतं, सिनेमात दीपिकानं दिलेले बोल्ड सीन्स. गेल्या 11  फेब्रुवारीला अमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा चांगला की वाईट यावर आम्ही बोलणार नाही. पण चित्रपटातील दोन गोष्टी मात्र लक्षवेधी आहेत. एक म्हणजे, दीपिकाचा अभिनय आणि दुसरी म्हणजे, चित्रपटातील लोकेशन्स. होय, चित्रपटातील समुद्राकाठी असलेल्या व्हिलाची तर बातच न्यारी. अलिबागच्या या व्हिलात दीपिका, सिद्धांत चतुर्वेदी,अनन्या पांडे, धैर्य कारवा असे चौघे व्हॅकेशनसाठी जातात, असं सिनेमात दाखवलं गेलं आहे.

आज आम्ही याच सुंदर व्हिलाबद्दल सांगणार आहोत. ‘गहराइयां’ चित्रपटाचं बरच शूटींग या सुंदर व्हिलात झालं.  चित्रपटात हा व्हिला  अलिबागमध्ये असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण प्रत्यक्षात हा व्हिला गोव्यात आहे आणि तो व्हिला नसून एक हॉटेल आहे.

होय, गोव्यातील या हॉटेलचं नाव ‘अहिल्या’असं आहे. नेरूल गोवास्थित या सी-फेसिंग व्हिला हॉटेलमध्ये जवळपास 9 खोल्या, दोन स्विमिंग पूल, गार्डन आणि स्पा एरिया आहे. ‘गहराइयां’ पाहून तुम्हालाही या हॉटेलात जाण्याची इच्छा अनावर झाली तर आधी खिशाची सोय मात्र बघायला हवी. कारण या हॉटेलचं भाडं चांगलंच तगडं आहे.

 या हॉटेलमधील एका खोलीचं एका रात्रीचं भाडं 21 हजार ते 33 हजार एवढं आहे.  अत्यंत रम्य आणि शांत  असलेल्या या सी-साइड हॉटेलमधून  डॉल्फिन दर्शनही तुम्ही घेऊ शकता.

एकूण 3 व्हिलाच्या या प्रॉपर्टीमध्ये प्रत्येक व्हिलामध्ये 3 खोल्या आहेत. यापैकी दोन व्हिलाच्या बाजूला स्विमिंग पूल आहे. सध्या या हॉटेलचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

‘गहराइयां’ हा सिनेमा  शकुन बत्रा यांनी दिग्दर्शित केला आहे.  दीपिका पदुकोण, धैर्य कारवा, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबतच  रजत कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूडसिद्धांत चतुर्वेदीअनन्या पांडे