९०च्या दशकातील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीला ओळखणं झालंय कठीण, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 08:00 PM2020-01-19T20:00:00+5:302020-01-19T20:00:00+5:30
या अभिनेत्रीनं अचानक एकदिवस बॉलिवूडला रामराम ठोकला.
मीनाक्षी शेषाद्रि 90 च्या दशकातील सुपरहिट हिरोईन. आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तिने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आणि एकदिवस अचानक बॉलिवूडला रामराम ठोकला. आता तिला ओळखणं कठीण झालं आहे.
५६ वर्षांची मीनाक्षी सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी नो मेकअप लूकमुळे तर कधी वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते.
I admire fitness enthusiasts like Deepika,Katrina,Kareena,Shilpa,Sushmita and Bhagyashri. pic.twitter.com/JxDMncQlWp
— Meenakshi Seshadri (@MinaxhiSeshadri) January 10, 2020
मध्यंतरी तिने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठीच्या रांगेत उभी असतानाचा व्हिडिओ तिने शेअर केला होता. ती या रांगेत तब्बल 8 तास थांबली. एवढा वेळ रांगेत थांबून आपल्याला कुणी ओळखलं नाही, असंही तिने ट्वीटमध्ये लिहिलं होतं.
Oops. I calculated wrong. I waited 8 hours No one recognized me. This is America! pic.twitter.com/cpo8rCHwIp
— Meenakshi Seshadri (@MinaxhiSeshadri) January 7, 2020
९०च्या दशकात बॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री आहे. हिरो, जुर्म, दामिनी अशा चित्रपटांमधून ठसा उमटवणारी मीनाक्षी शेषाद्रीचा हा फोटो तिने स्वतःच शेअर केला आहे.
Happy Valentine’s Day in advance pic.twitter.com/eWjPrXDl6E
— Meenakshi Seshadri (@MinaxhiSeshadri) February 13, 2019
१९९६ मध्ये चित्रपटातून संन्यास घेऊन ती नवऱ्याबरोबर अमेरिकेत स्थायिक झाली. मीनाक्षीला दोन मुलं आहेत. अमेरिकेत भरतनाट्यमचं प्रशिक्षण ती देते.
मीनाक्षी शेषाद्रीने अनेक हिंदी आणि तमीळ, तेलुगू चित्रपट केले आहेत.
१९८१ मध्ये मिस इंडियाचा किताब तिला मिळाला होता. त्या वेळी ती १७ वर्षांची होती. हरीश मायसोर या इन्व्हेस्टर बँकरशी लग्न करून ती अमेरिकेत गेली.