बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचे कोरोनाने निधन, हळहळले बॉलिवूडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 05:33 PM2021-04-22T17:33:17+5:302021-04-22T17:33:49+5:30

बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचे कोरोनामुळे निधन झाले.

Famous Bollywood cinematographer Johnny Lal dies with corona | बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचे कोरोनाने निधन, हळहळले बॉलिवूडकर

बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचे कोरोनाने निधन, हळहळले बॉलिवूडकर

googlenewsNext

बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचे कोरोनामुळे निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून ते कोरोनाने पीडित होते. मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जॉनी लाल यांना कोरोनाची लागण झाली होती. ते घरीच विलगिकरणामध्ये राहून उपचार घेत होते. तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

जॉली लाल यांनी 'रहना है तेरे दिल में' आणि 'मुझे कुछ कहना है' यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटासाठी काम केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अभिनेता आर. माधवन, तुषार कपूर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


आर. माधवनने ट्विट केले की, 'विघ्न सुरुच असून 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटाचे डीओपी (कॅमेरामन) जॉनी लाल यांचे निधन झाले आहे. तुम्ही एक अद्भूत व्यक्ती होतात. RIP सर. तुमचा विनम्र स्वभाव, दयाळूपणा आणि प्रतिभा नेहमीच आठवणीत राहील'.


तर तुषार कपूरने ट्विटमध्ये लिहिले की, 'RIP जॉनी सर! 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटाला तुम्ही अशा पद्धतीने शूट केले की तो आजही एकदम फ्रेश वाटतो. माझ्या पहिल्या चित्रपटाला एक सुंदर, तरुण, नैसर्गिक लूक देण्यासाठी खूप खूप धन्यवाद'.

Web Title: Famous Bollywood cinematographer Johnny Lal dies with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.