गायिका कनिकावर कोसळला दुःखाचा डोंगर, तिच्या बहिणीचं झालं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 07:20 PM2019-08-27T19:20:38+5:302019-08-27T19:20:58+5:30
गायिका कनिका कपूरच्या बहिणीचं निधन झालं आहे.
चिट्टीयां कल्लाईयां वे, बीट पे बूटी यांसारख्या गाण्यातून लोकप्रिय झालेली गायिका कनिका कपूरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. कनिकाच्या बहिणीचं निधन झालं आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. या पोस्टवर कनिकाचे चाहते श्रद्धांजली देत आहे.
कनिका कपूरने इंस्टाग्रामवर लिहिलं की, माझी बहिण एनाबेलचं निधन झालं. देव तिच्या आत्म्यास शांती देवो. यावेळी मला काय वाटतंय ते मी शब्दात नाही सांगू शकत. माझ्या जीवनातील सर्वात वाईट दिवस आहे. सर्व चांगल्या आठवणींना माझ्या हृद्याजवळ ठेवेन. खूप सारे प्रेम. या पोस्टसोबत कनिकानं तिचा फोटोदेखील शेअर केला आहे.
कनिकाचा २०१२ साली सर्वात पहिला म्युझिक व्हिडिओ आला होता. ज्याचं नाव होतं 'जुगनी जी'. त्यानंतर 'रागिनी एमएमएस २'मधील बेबी डॉल या गाण्याच्या रिमेक्समधून ती चर्चेत आली. त्यानंतर कनिकाने बॉलिवूडमधील एका नंतर एक अशी गाणी गायली. बेबी डॉल या गाण्यातून कनिका एका रात्रीत स्टार बनली होती. इतकंच नाही तर या गाण्यासाठी तिला फिल्म फेअरचा फिमेल प्लेबॅक सिंगरचा पुरस्कार मिळाला होता.
कनिका सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.
कनिका मुळची लखनऊची आहे. ती १९९७ साली बिझनेसमॅन राज चंदोकसोबत लग्न करून लंडनमध्ये शिफ्ट झाली होती. लंडनमध्येच कनिकाने तीन मुलांना जन्म दिला. काही कालावधीनंतर कनिका पतीपासून विभक्त झाली आणि मुंबईला परतली.
मुंबईत परतल्यानंतर तिने तिचं संपूर्ण लक्ष करियरवर केंद्रीत केलं.