Join us

'या' प्रसिद्ध गायिकेचा काही काळासाठी सोशल मीडियाला अलविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:24 IST

आपल्या गाण्यांनी जगभरातील श्रोत्यांना तिनं वेड लावलं आहे.​​​​

हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका सेलेना गोमेझ आपल्या गायिकीमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. ती सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.  आपल्या गाण्यांनी जगभरातील श्रोत्यांना तिनं वेड लावलं आहे. वैयक्तिक आयुष्य असो वा व्यावसायिक ती कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. सध्या ती एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. 

इंस्टाग्रामवर सेलेनाचे मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत. सेलेनाच्या एका फोटोने सर्वाधिक कमेंट्स आणि लाईक्सचा विक्रमही मोडला आहे. नुकतेच सोशल मीडियापासून पुन्हा एकदा ब्रेक घेत असल्याचं सेलेनाने जाहीर केलं.  एवढेच नाही तर यामागचे कारणही त्याने आपल्या पोस्टमध्ये शेअर केले आहे. 

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध 6 ऑक्टोबर रोजी सुरू झालेलं युद्ध अजूनही सुरूच आहे. या युद्धात दोन्ही देशांतील हजारो लोक मारले जात असले तरी हे युद्ध थांबत नाही. या परिस्थितीमध्ये कोणी इस्रायलला पाठिंबा देत आहे. तर कोणी पॅलेस्टाईनसाठी पुढे येत आहे. अभिनेत्री सेलेना देखील त्यापैकी एक आहे. सेलेना गोमेझने इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर भाष्य केले आहे. 

पोस्टमध्ये तिने लिहिले, 'मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. कारण जगात सुरू असलेली दहशत, द्वेष, हिंसा पाहून माझं काळीज तिळ तिळ तुटत आहे. आपण सर्व लोकांचे विशेषत: लहान मुलांचे रक्षण केले पाहिजे आणि हा हिंसाचार एकदाच थांबवावा. यासाठी माझे शब्द कधीही पुरेसे नसतील. मला माफ करा. निष्पाप लोकांना होणारा त्रास मी पाहू शकत नाही. माझ्या हातात असतं तर मी हे जग बदलू शकले असते'. यापूर्वीही सेलेनाने सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. अनेक सेलिब्रिटी थोड्या थोड्या काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतात.

टॅग्स :सेलेना गोमेझसेलिब्रिटीसोशल मीडिया