Join us

अभिनेत्री काजल अग्रवालचं झालं लग्न, फॅनने तिच्या नावाचा हातावर काढला टॅटू...

By अमित इंगोले | Updated: October 31, 2020 16:31 IST

काजलसोबतच तिच्या फॅन्ससाठीही हा दिवस खास होता. तिच्या लग्नाबाबत तिचे फॅन्सही आनंदी होते. एका फॅनने तर काजलच्या नावाचा टॅटू देखील काढून घेतला.

बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवणारी अभिनेत्री काजल अग्रवाल नुकतीच लग्न बंधनात अडकली. बिझनेसमन गौतम किचलूसोबत लग्न केलं. काजलसाठी हा दिवस स्पेशल होता. ती किती आनंदी होती हेही तिच्या व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओंमधून दिसून येत होतं. काजलसोबतच तिच्या फॅन्ससाठीही हा दिवस खास होता. तिच्या लग्नाबाबत तिचे फॅन्सही आनंदी होते. एका फॅनने तर काजलच्या नावाचा टॅटू देखील काढून घेतला.

काजलच्या एका फॅनने तिच्या हातावर काजलच्या नावाचा टॅटू काढला. हा टॅटू तिने काजलच्या लग्नाच्या एक दिवसआधी काढला. ट्विटरवर फॅनने फोटो शेअर करत लिहिले की, फायनली परमनन्ट झाला. हा केवळ काजलसाठीच स्पेशल दिवस नाही तर माझ्यासाठीही आहे. हॅपी वेडींग Kaju.

 

काजलच्या लग्नाबाबत सांगायचं तर तिचं लग्न मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये झालं. कोरोना बघता लग्नाला मोजकेच पाहुणे आले होते. लग्नाला घरातील लोक आणि जवळचे मित्र होते. लग्नात कपल सुंदर दिसत होतं. लग्नाआधी संगीत सेरमनी झाली. काजलच्या संगीताचे आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

काजलचा पती गौमत किचलूबाबत सांगायचं तर तो Discern Living Technology Solutions Private Limited चा फाउंडर आणि एक इंटेरिअर डिझायनर आहे. तेच काजलबाबत सांगायचं तर तिने साउथ इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं आहे. तसे बॉलिवूडमध्ये ती सिंघम सिनेमात दिसली होती.  

 

टॅग्स :काजल अग्रवालबॉलिवूडलग्न