Join us

भन्नाट! 'लग्न, लग्न, लग्न...': रॉकी भाईच्या चाहत्याने आमंत्रण पत्रिकेवर रिक्रिएट केला 'KGF Chapter 2'मधला डायलॉग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:41 PM

साऊथ सुपरस्टार यशचा ( yash ) ‘केजीएफ 2’ ( KGF Chapter2 )बॉक्स ऑफिसवर सूसाट पळतोय.

यश-स्टारर 'KGF Chapter 2' 'रॉकी भाई'च्या सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालतोय. रिलीज नंतर अवघ्या चारच दिवसांत या सिनेमाने 500 कोटींचा आकडा पार केला आहे. पुष्पाप्रमाणे या सिनेमातील डायलॉग पण हीट होतोयेत. Violence, Violence, Violence... I Don’t Like It. I Avoid! But... Violence Likes Me, I Can’t Avoid!" हा डायलॉग तर सिनेमा पाहणाऱ्यांना  सगळ्यांना पाठ झालाय. 

KGF हा फक्त एक चित्रपट राहिला नसून तर तो एक ब्रँड आहे. 'KGF Chapter 2' 14 एप्रिल रोजी जगभरात रिलीज झाला  'रॉकी भाई' केवळ बॉक्स ऑफिसवरच वर्चस्व गाजवत नाही तर त्याच्या चाहत्यांच्या मनात एक खास स्थानही निर्माण करत आहे.

 थिएटरमध्ये सिनेमा रिलीज झाल्यावर त्यातील डायलॉग सोशल मीडियावर ट्रेंड करु लागतात.  "पुष्पा, पुष्पा राज, मै झुकेगा नही साला". अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा: द राइज' मधला हा संवाद आठवतोय? या संवादाने प्रभावित झालेल्या पश्चिम बंगालच्या एका विद्यार्थ्याने त्याच्या बोर्डाच्या परीक्षेत लिहिले, "पुष्पा राज... अपुन लिखेगा नहीं...".

 असेच काहीसे रॉकी भाईच्या चाहत्याने ही केलं आहे. रॉकी भाईच्या चाहत्याने तर चक्क लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर KGF मधला डायलॉगला रिक्रेट करुन लिहिला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी याला रॉकी भाईची क्रेझ म्हटलं आहे. रील लाईफपासून ते रिअल लाईफपर्यंत रॉकी भाई साम्राज्य निर्माण करत आहे.

चंद्रशेखर नावाचा व्यक्तिची ही लग्न पत्रिका आहे. चंद्रशेखर 13 मे रोजी कर्नाटकातील बेलेगावी येथे श्वेतासोबत लग्न करणार आहे. त्याने आपल्या लग्नपत्रिकेवर लिहिले आहे, "लग्न, लग्न, लग्न, मला ते आवडत नाही, मी टाळतो, पण माझ्या नातेवाईकांना लग्न आवडते, मी ते टाळू शकत नाही." सोशल मीडियावर सध्या ही पत्रिका वाऱ्यासारखी व्हायरल होतोय.  

टॅग्स :केजीएफयश