Join us  

मराठी नाही आता थेट इंग्लिश गाण्यावर फँड्री फेम शालूने लावले ठुमके, तुम्ही पाहिले का ? video viral

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 9:00 AM

फँड्रीफेम शालू म्हणजेच राजेश्वरी खरातचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे.

सध्याचा जमाना सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनचा आहे. या माध्यमातून अनेक जण आपल्या आवडत्या कला जोपासतात. आपल्या कलेचं दर्शन जगाला घडवून देण्यासाठी आजच्या युगातली ही माध्यमं बरीच हिट ठरत आहेत. कुणी आपला व्हीडीओ बनवतं तर कुणी सूरेल आवाजातील गाणं सोशल मीडियावर पोस्ट करतो. या व्हिडीओला किंवा पोस्टला तात्काळ हिट्स मिळतात आणि संबंधित व्यक्ती लगेच चर्चेत येते ही सोशल मीडियाची ताकद आहे. 

सेलिब्रेटी मंडळीसुद्धा ट्रेंड नुसार व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सेलिब्रेटी सतत सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचे व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांची पसंती मिळवत असतात. सध्या फँड्रीफेम शालू म्हणजेच राजेश्वरी खरातही सोशल मीडियामुळेच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर ती खूपच सक्रीय असते. फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. 

खऱ्या आयुष्यात राजेश्वरी प्रचंड ग्लॅमरस आहे.सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे विविध अंदाजातील फोटो व्हिडीओ बघायला मिळतील. दिवसेंदिवस ती अधिकच ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमध्ये ती पाहायला मिळते. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोना चाहत्यांच्या भरभरून लाईक्स आणि कमेंट्स असतात. राजेश्वरी तिच्या कुटुंबासोबत सध्या पुण्यात राहते. 

सध्या फँड्रीफेम शालू म्हणजेच राजेश्वरी खरातचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे.मुळात हा व्हिडीओ जुनाच आहे. तरी पुन्हा तो व्हायरल होत आहे. वारंवार हा व्हिडीओ पाहिला जातोय. या व्हिडीओमुळे चाहत्यांचे लक्ष त्याच्यावरच खिळले आहे. राजेश्वरीचा व्हिडीओतला अंदाजही चाहत्यांना आवडला आहे. तिच्या या व्हिडीओत चाहते कमेंट्स लाईक्स करत पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून चाहते फुल ऑन फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच व्हिडीओमुळे राजेश्वरीची पुन्हा सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर इतरांप्रमाणे शालूचाही बोलबाला असल्याचे पाहायला मिळते. 

टॅग्स :राजेश्वरी खरात