बॉलिवूडची 'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकर (Isha Koppikar) अनेक चित्रपटांमध्ये दिसली. तिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले. गर्लफ्रेंड, एक विवाह ऐसा आणि डॉन यांसारख्या चित्रपटातून तिला विशेष ओळख मिळाली. सध्या ती चित्रपटांपासून दूर तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यग्र आहे, पण ती पुन्हा एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटांऐवजी ती ओटीटीवर दिसणार आहे. ईशा कोप्पीकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे लेटेस्ट फोटो व्हिडीओ शेअर करत असते. लेटेस्ट फोटोमध्ये ईशा पूर्वीपेक्षा जास्त ग्लॅमरस दिसत आहे.
ईशा कोप्पीकरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि तिला खूप पसंती मिळाली, पण ती कधीच टॉप अभिनेत्रींच्या यादीत नव्हती. सहाय्यक भूमिकेशिवाय ती काही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेतही दिसली. ईशाने बिझनेसमन टिमी नारंगसोबत लग्न केले आहे. तो हॉटेल व्यावसायिक आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर ईशाचा जन्म मुंबईतील माहीममध्ये झाला. त्यांनी मुंबईतूनच शिक्षण पूर्ण केले. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. १९९५ मध्ये ईशा कोप्पीकरने मिस इंडियामध्ये भाग घेतला, जिथे तिने मिस टॅलेंटचा किताब जिंकला. १९९७ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
ईशाचा पहिला चित्रपट 'एक था दिल एक थी धडकन' होता. २००० मध्ये आलेल्या 'फिजा' चित्रपटात ती करिश्मा कपूर आणि हृतिक रोशनसोबत दिसली होती. तिने डरना मना है, कयामत, दिल का रिश्ता, पिंजर, मैने प्यार क्यूं किया, डॉन आणि कृष्णा कॉटेज यांसारख्या अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले. फिल्म कंपनीच्या “खल्लास” या गाण्याने ईशा प्रसिद्धीच्या झोतात आली आणि तिला खल्लास म्हणून ओळखले जाऊ लागली.