सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो.
सेलिब्रिटींची लोकप्रियता इतकी असते की, कधी तो अभिनयाव्यतिरिक्त दुसरे काही काम करताना दिसलाच तर त्याची लगेचेच चर्चा होते. नुकताच एक्शन हिरो जॉन अब्रामह सिनेमाची तिकीटं विकताना दिसला. सध्या त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून जॉन इथे काय करतोय असा विचार तुम्ही करत असाल, सोशल मीडियावर जॉनच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.
सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात... छोट्या पडद्यावरच्या शोमध्ये येऊन सिनेमाचं प्रमोशन करण्याचा फंडा हिट झाला असताना जॉनने मात्र वेगळी वाट धरलीय... त्यानं थेट फॅन्सना तिकीटं देत सिनेमाचे प्रमोशन केले आहे. 'मुंबई सागा' सिनेमा सुपरहिट व्हावा यासाठी आता निर्मात्यांबरोबर कलाकारांनीदेखील कंबर कसली आहे.
म्हणून वेगवेगे फंडे वापरत सध्या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे. सिनेमाच्या प्रदर्शनानंतरही सिनेमातील कलाकार रसिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशाप्रकारे प्रमोसन करताना दिसत आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रमोशन अजूनही जोरदार सुरु आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्या थिएटरमध्ये जॉनने तिकीटं दिलंच तर चक्रावून जाऊ नका.
कोरोना काळात चित्रपटगृहांना टाळे लागले आणि निर्माते-दिग्दर्शक ओटीटीकडे वळले. नुकसान टाळण्यासाठी अनेक मेकर्सनी ओटीटीवर धडाधड सिनेमे प्रदर्शित केलेत. पण जॉन अब्राहमला मात्र ओटीटी हा पर्यायच मान्य नव्हता. होय, काहीही झाले तरी मी ओटीटीच्या कुबड्या स्वीकारणार नाही, असे त्याने म्हटले होते. मी मोठ्या स्क्रिनचा अभिनेता आहे. सबस्क्रिप्शन फीजमध्ये तुम्ही मला खरेदी करु शकत नाही, असेही तो म्हणाला होता.
माझ्या 18 वर्षांच्या करिअरमध्ये मी अनेक मोठ्या बॅनर्ससोबत काम केले. तसेच कमी बजेटचे सिनेमेही केलेत. मल्टीस्टारर सिनेमेही स्वीकारलेत. मी जे काही कमावतो, त्यात समाधानी आहे. माझ्यासाठी पैसा हा फार मोठा विषय नाही. मी कामासाठी मोठ्या डायरेक्टरच्या दरवाज्याबाहेर उभा होऊ शकत नाही. हा अहंकार नाही तर आत्मसन्मनाचा विषय आहे, असेही जॉन म्हणाला होता.