Join us

'माझी होशील का' म्हणत 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपाला चाहत्याने केले प्रपोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 1:10 PM

'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदेला एका चाहत्याने सोशल मीडियावर प्रपोझ केले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा'ने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेचे कथानक आणि यातील पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील दीपाने आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांनाच आपलेसे केले आहे. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे. रेश्माला दीपाच्या भूमिकेत प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. दिवसेंदिवस तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. रेश्मा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे आणि ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. तिचे चाहतेदेखील फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात. एका चाहत्यांने तर तिला सोशल मीडियावर थेट प्रपोझ केले आहे.

दीपा म्हणजेच रेश्मा शिंदेने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटले की, असे कधीही समजू नका की मोठ्याने बोलणे म्हणजे स्ट्राँग आहे आणि शांत असणे म्हणजे कमकुवत आहे. या फोटोत रेश्मा खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोला खूप पसंती मिळते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. कुणी तिला परमसुंदरी म्हणत आहे तर कुणी लय भारी दिसते, सुंदर. मात्र एका चाहत्याच्या कमेंट्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चाहत्याने फोटोवर कमेंट केली आहे की, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. माहीत नाही माझी होशील का, प्रेम फक्त तुझ्यासाठी नादखुळा. या चाहत्याने चक्क फोटोवर कमेंट करत तिला प्रपोझच केले आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने हिंदी मालिकेतही काम केले आहे. तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातही ती झळकली आहे.

टॅग्स :रेश्मा शिंदे