Join us  

कतरिना कैफ व विकी कौशलच्या कारची नंबरप्लेट पाहून थक्क व्हाल; चाहते म्हणाले, गुपित काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 2:45 PM

कतरिना व विकी कौशलच्या कारच्या नंबरप्लेटचे फोटो व्हायरल होत आहेत. पाहा तर...

ठळक मुद्देविकी आणि कतरिच्या एका चाहत्यानं त्यांच्या कारच्या नंबरप्लेटचे फोटो व्हायरल केले आहेत. आता यावरून दोघांच्याही रिलेशनशिपच्या चर्चेला जोर चढणार नसेल तर नवल.

चला तर, बॉलिवूडचं आणखी एक कपल येत्या दिवसांत लग्नबंधनात अडकणार, असं वाटतंय. चर्चा तर हीच आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) व विकी कौशल (Vicky Kaushal ) यांच्याबद्दल. कॅट व विकीच्या लग्नासाठी येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमधील मुहूर्त ठरल्याचं मानलं जातंय. अद्याप दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. पण लग्नाची चर्चा जोरात आहेत आणि अशात विकी व कॅटच्या कारचीही चर्चा रंगली आहे.विकी आणि कतरिना दोघंही आपल्या रिलेशनशिपवर बोलायला तयार नाही. पण दोघंही अनेकदा एकत्र दिसतात. अलीकडे पुन्हा एकदा हे कपल एकत्र दिसलं. दोघंही रेश्मा शेट्टीच्या ऑफिसात पोहोचले. यावेळी त्यांच्या कारच्या नंबरप्लेटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. होय,नंबर प्लेट पाहून चाहतेही हैराण झालेत.

कतरिनाच्या रेंज रोव्हर गाडीचा नंबर 8822 होता आणि विकीच्या रेंज रोव्हरचा नंबर 7722 होता. दोघांच्याही गाडीचं मॉडेल एक, नंबरही एकार्थाने सारखे. फरक तो फक्त रंगाचा. होय, कॅटची गाडी पांढ-या रंगाची तर विकीची गाडी ब्लॅक रंगाची.  विकी आणि कतरिच्या एका चाहत्यानं त्यांच्या कारच्या नंबरप्लेटचे फोटो व्हायरल केले आहेत. आता यावरून दोघांच्याही रिलेशनशिपच्या चर्चेला जोर चढणार नसेल तर नवल.ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार कॅट व विकी दोघांच्या कुटुंबानी त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवातही केली आहे. लग्नासाठी कतरिनाचा लेहंगा खास सब्यसाची डिझाइन करत आहेत. लग्नात कतरिनाचा लेहंगा कसा असावा यावर सध्या काम सुरु आहे. नोव्हेंबर -़ डिसेंबरमध्ये ह कपल लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल