शाहरूख खान ( Shah Rukh Khan) व गौरी खानचा ‘लाडला’ आर्यन खान (Aryan Khan) याने नुकतंच एक फोटोशूट केलं. ‘मैं हूं ना’ स्टाईलमध्ये आर्यनने केलेल्या या फोटोशूटची सध्या जबरदस्त चर्चा आहे. इतकी की, आर्यन ट्विटरवर ट्रेंड करतोय. आर्यनचे फोटो पाहून पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. आर्यन अद्यापही फिल्मी दुनियेपासून दूर आहे. पण लोकप्रियतेच्या बाबतीत आर्यन बॉलिवूड स्टार्सवरही भारी पडताना दिसतोय. होय, ट्विटरवर सध्या आर्यनचीच चर्चा आहे. आर्यनने त्याच्या एका चाहत्यासोबत जे काही केलं, ते पाहून युजर्स त्याच्या प्रेमात पडले आहेत.
आर्यन अलीकडे मुंबई एअरपोर्टवर दिसला. आर्यन दिसताच पापाराझी त्याच्याकडे धावले. याचदरम्यान एका चाहत्याने आर्यनला गुलाबाचं फुल दिलं. आपल्याकडून आर्यन फुल स्वीकारेल, असं त्या चाहत्याला वाटलं नव्हतं. पण आर्यनने गुलाब तर स्वीकारालाच शिवाय पापा शाहरूख खानच्या स्टाईलमध्ये त्याला सलाम करत, त्याचे आभारही मानलेत.
आर्यनच्या या कृतीने फॅन्स भारवले. अनेकांनी आर्यनच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. मुंडा स्वीट है, असं एका युजरने लिहिलं आहे. अनेकांना आर्यनच्या कृतीने शाहरूखची आठवण करून दिली. जसा बाप, तसा मुलगा, अशा कमेंट तर अनेकांनी केल्या.
आर्यनला विमातळावर पाहून अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढले. एका चाहत्याने तर अचानक आर्यनचा हात हातात घेत, त्याच्या हाताचं चुंबन घेतलं. आर्यनने कुठलाही अॅटिट्यूड न दाखवता चाहत्यांसोबत फोटो काढले.आर्यन सोशल मीडियावर फार सक्रीय नाही. पण त्याने एखादी पोस्ट केली की लगेच ती व्हायरल होते. आर्यनने स्पोर्ट ब्रँडसाठी फोटोशूट केलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. ते पाहून चाहते क्रेझी झालेत.
आर्यन खानला बिग स्क्रीनवर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. पण त्याला अभिनयाऐवजी दिग्दर्शनात रस आहे. खुद्द शाहरूखने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. आर्यनला पडद्यामागे राहून काम करायचं आहे. यामुळे तो दिग्दर्शनातील बारकावे शिकतोय, असं शाहरूखने सांगितलं होतं. आर्यनने फिल्म व टीव्हीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्नियातून डिग्री घेतली आहे. तो मार्शल आर्ट्समध्येही ट्रेंड आहे. डबिंगमध्येही तो पारंगत आहे. 2019 मध्ये त्याने ‘द लायन किंग’च्या हिंदी व्हर्जनमध्ये सिंबाच्या पात्राला आवाज दिला होता.