बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी(Sunny Leone)ला सोशल मीडिया क्वीन म्हटले जाते. अभिनेत्री तिच्या पोस्ट्समधून लोकांचे मनोरंजन करत असते. पण सध्या सनीचा असा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती रक्तबंबाळ झालेली दिसत आहे. अभिनेत्रीचे असे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे आणि त्यांना सनीला काय झाले हे जाणून घ्यायचे आहे. तिचे चाहते चिंतेंत पडले आहेत.
सनी लिओनीचे व्हायरल झालेले हे फोटो तिच्या आगामी वेबसीरिजमधील आहेत. सनी लिओनी पुन्हा एकदा ओटीटीवर कमबॅक करणार आहे. सनी लिओनीची अनामिका ही वेब सीरिज १० मार्च रोजी रिलीज झाली आहे. 'अनामिका' चित्रपटगृहांमध्ये नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वी सनीने तिच्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया हँडलवर 'अनामिका'चे जोरदार प्रमोशन केले आहे.
सनी लिओनी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सतत असे काही फोटो शेअर करत असते, ज्यामध्ये तिच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. अलिकडेच अभिनेत्रीने अनामिकाचा असाच एक फोटो शेअर केला आहे, जे पाहून अंगावर शहारे आले. या फोटोमध्ये सनी हॉस्पिटलच्या बेडवर पडली असून तिच्या चेहऱ्यापासून मागच्या बाजूला दुखापतीच्या खुणा दिसत आहेत.
सनी लिओनच्या 'अनामिका' वेब सीरिजचे ८ एपिसोड्स स्ट्रीम होणार आहेत, ज्यामध्ये समीर सोनी, सोनाली सहगल, राहुल देव, शहजाद शेख आणि अयाज खान हे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.