Join us

भाग्यश्री मोटेने नको त्या ठिकाणी गोंदवला 'महामृत्युंजय मंत्र'; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 17:15 IST

Bhagyshree mote: अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या शरीरावर टॅटू गोंदवला असून त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.

ठळक मुद्देभाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने चाहत्यांना तिचा टॅटू दाखवला आहे

'काय रे रास्कला' या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे. उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर भाग्यश्रीने तिचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी भाग्यश्री कायमच प्रयत्न करत असते. यात अनेकदा ती तिच्या जीवनातील लहान-लहान गोष्टीही नेटकऱ्यांसोबत शेअर करते. अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या शरीरावर टॅटू गोंदवला असून त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र, तिचा हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने चाहत्यांना तिचा टॅटू दाखवला आहे. सोबतच तिचा हा पहिला टॅटू असल्याचं तिने सांगितलं आहे. विशेष म्हणजे तिने टॅटू म्हणून महामृत्युंजय मंत्राची निवड केली आहे. परंतु, तिने शरीराच्या ज्या भागावर हा टॅटू काढला आहे तो पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.भाग्यश्रीने तिच्या कंबरेच्या किंचितवरच्या भागामध्ये महामृत्युंजय मंत्राचा टॅटू काढला आहे.  हा टॅटू पाहिल्यावर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. मात्र, टॅटू काढण्यासाठी तिने निवडलेली जागा पाहून काही जणांनी तिला ट्रोल केलं आहे.

'स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार ज्याला म्हणतात तो हाच', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'भाग्यश्री आणि हा टॅटू काढणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे',  'महामृत्युंजय मंत्रासारखा पवित्र मंत्र शरीरावर गोंदवून घेताना लाज वाटली पाहिजे', अशी टीका अनेक नेटकऱ्यांनी केली आहे. 

दरम्यान, भाग्यश्री मोटे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने  'काय रे रास्कला', 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातही ती झळकली आहे.  

टॅग्स :भाग्यश्री मोटेटिव्ही कलाकारसेलिब्रिटी