Join us

डॉन ३ मधील रणवीर सिंगच्या कास्टिंगवर उभे राहिले प्रश्न, फरहान अख्तर म्हणाला- याची जबाबदारी आता....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 1:32 PM

'डॉन 3'चा टीझर रिलीज होताच नेटकऱ्यांच्या कमेंट्समध्ये उड्या पडल्या. शाहरुख नाही तर 'डॉन 3' नाही अशाच प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे येत होत्या.

बॉलिवूडमध्ये 'डॉन'च्या नव्या युगाला सुरुवात होत आहे. दिग्दर्शक फरहान अख्तरने (Farhan Akhtar) रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) नावाची घोषणा करत शाहरुख खान (Shahrukh Khan) बाहेर गेल्याचं समोर आलं.  'डॉन 3'चा टीझर रिलीज होताच नेटकऱ्यांच्या कमेंट्समध्ये उड्या पडल्या. शाहरुख नाही तर 'डॉन 3' नाही अशाच प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे येत होत्या. काही लोकांनी फरहान अख्तरच्या कास्टिंगवर प्रश्न उपस्थित केलं. आता या सगळ्या प्रकरणावर फराहन अख्तने मौन सोडलं आहे.  

नवा डॉन म्हणून रणवीर सिंगच्या कास्टिंगवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर फरहान अख्तरने सडेतोड उत्तर दिले आहे. वाढत्या वाद आणि ट्रोलिंगवर तो म्हणाला, 'मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. रणवीर सिंग एक उत्कृष्ट अभिनेता आहे. चित्रपटाच्या या भागासाठी तो परफेक्ट आहे. तो स्वतः या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आणि नर्व्हस आहे.

फरहान पुढे म्हणाला, 'शाहरुख खान 'डॉन' करताना देखील याआधीही अशा प्रकारचे प्रश्न आणि भावनिक प्रक्रियेतून गेलो आहोत. त्यावेळी सर्वजण म्हणाले की अरे देवा, तू अमिताभ बच्चनची जागा कशी रिप्लस करु शकतोस? पण, त्यानंतर प्रेक्षकांना सिनेमा आवडला.

फरहान या चित्रपटातील रणवीरच्या कास्टिंगचे समर्थन करत म्हटले की, 'तो त्याच्या स्वत: च्या स्टाईल आणि अंदाजात ही भूमिका साकारेल. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे ती प्रतिभा आहे. तो ही भूमिका उत्तम पद्धतीने साकारणार आहे. मला वाटते की स्क्रिप्ट आणि चित्रपट माझ्या दृष्टीकोनानुसार चालतील याची जबाबदारी आता माझ्यावर आहे.

एक्सेल एंटरटेन्मेंटच्या रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर निर्मित 'डॉन 3' २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित पहिल्या दोन भागांमध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसला. 'डॉन 3' मधून शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा दोघेही आऊट झाले आहेत. तर आता प्रियंकाच्या जागी कियारा अडवाणी असल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :फरहान अख्तररणवीर सिंग