PHOTOS : फरहान अख्तरच्या लेकीला पाहून थक्क व्हाल, आहे फारच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 10:19 AM2022-08-08T10:19:38+5:302022-08-08T10:21:09+5:30

Farhan Akhtar Daughter Shakya Akhtar : सध्या फरहान अख्तरच्या लेकीची चर्चा आहे. काल शाक्याने तिला 22 वा वाढदिवस साजरा केला आणि ती अचानक चर्चेत आली. ग्लॅमर वर्ल्डपासून दूर असलेल्या शाक्याच्या फोटोंनी सगळ्यांना वेड लावलं.

Farhan Akhtar Daughter Shakya Akhtar PHOTOS | PHOTOS : फरहान अख्तरच्या लेकीला पाहून थक्क व्हाल, आहे फारच ग्लॅमरस

PHOTOS : फरहान अख्तरच्या लेकीला पाहून थक्क व्हाल, आहे फारच ग्लॅमरस

googlenewsNext

बॉलिवूडचा  अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि सिंगर फरहान अख्तर (Farhan Akhtar  ) म्हणजे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. लव लाईफमुळे चर्चेत राहणाऱ्या फरहानमध्ये अनेक टॅलेंट आहेत. पण त्याची लेक शाक्या अख्तर (Shakya Akhtar) ही सुद्धा कमी टॅलेंटेड नाही. सध्या फरहान अख्तरच्या लेकीची चर्चा आहे. काल शाक्याने तिला 22 वा वाढदिवस साजरा केला आणि ती अचानक चर्चेत आली. ग्लॅमर वर्ल्डपासून दूर असलेल्या शाक्याच्या फोटोंनी सगळ्यांना वेड लावलं.

फरहानने काल शाक्याचा एक फोटो पोस्ट करत, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. ‘हॅपी बर्थ डे ब्युटिफुल गर्ल’ असं त्याने लिहिलं. डॅडीने शेअर केलेला लेकीचा फोटो पाहून सगळेच हैराण झालेत. ही फरहानची लेक आहे, यावर अनेकांचा विश्वास बसेना. फरहान अख्तरची बहिण जोया अख्तर हिनेही शाक्याचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शाक्या प्रचंड स्टायलिश आहे.

वडिलांसारखाची एखाद्या पॉपस्टारसारखी तिची स्टाईल आहे. ती स्वत:ला डिजिटल क्रिएटर म्हणवते. लाईमलाईटपासून दूर राहणं पसंत करते. पण तिचा फॅशन सेन्स गजब आहे. येत्या काळात शाक्या बॉलिवूड इंडस्ट्रीत आली तर नवल वाटायला नको.

शाक्या ही फरहान व त्याची पहिली पत्नी अधुना यांची मुलगी आहे. फरहान व अधुनाचा घटस्फोट झाला आहे. या दांम्पत्याला दोन मुली आहेत. एक शाक्या आणि दुसरी अकीरा. शाक्या 22 वर्षांची झाली आहे आणि अकीरा 15 वर्षांची आहे. फरहानने याचवर्षी शिबानी दांडेकरसोबत लग्न केलं.

Web Title: Farhan Akhtar Daughter Shakya Akhtar PHOTOS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.