कोरोनाच्या नियमांचं नागरिक पालन करीत नसल्याने कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चाललाय अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वत्रच कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कलाकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यातल्या काही कलाकारांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
फर्जंद आणि फत्तेशिकस्त मध्ये काम केलेल्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.. 🙏🙏
Posted by Digpal Lanjekar on Saturday, 1 May 2021
फत्तेशिकस्त सिनेमातला कलाकार नवनाथ गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली होते. अखेर कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. नवनाथ गायकवाडच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवरही शोककळा पसरली आहे.
‘फत्तेशिकस्त’ आणि ‘फर्जंद’ सारख्या चित्रपटांत नवनाथ गायकवाड झळकले होते. अशा या हरहुन्नरी कलाकाराला ‘फत्तेशिकस्त’चे लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
'माझं कुटुंब माझी जबाबदारी!', सुबोध भावेनं लोकांना मास्क घालण्याचं केलं आवाहन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. तरीदेखील काही जण विनाकारण बाहेर भटकत आहेत आणि नियमांचे पालनही करताना दिसत नाहीत. दरम्यान आता मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्याने माझं कुटुंब माझी जबाबदारी असेदेखील आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.सुबोध भावेने इंस्टाग्रामवर एकाच पोस्टमध्ये दोन फोटो टाकले आहेत. एका फोटोत त्याने मास्क घातलेला दिसतो आहे आणि दुसऱ्या फोटोत मास्क घातलेला नाही. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले की, पहिला- मी मास्क वापरतो कारण मला कुटुंबाची काळजी आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी!
अभिनेता हेमंत ढोमेने याविषयी दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्याने स्मशानात रूपांतरित केलेल्या बागेचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिलं, 'बाग म्हणजे... खेळायची जागा, आज्जी आजोबांनी आपल्याला फिरायला नेऊन गोष्टी सांगायची, चिऊताई, खारुताई बघायची जागा... साळुंखीची जोडी शोधायची जागा... तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं... पण आपण सारे मिळून या राक्षसाला हरवू! पुन्हा बागडायला आपल्या फुलांच्या बागा मिळवू!' असा सकारात्मक संदेशही दिला आहे.