Join us  

'या' पदार्थांचे शौकीन आहेत 'हे' बॉलिवूड स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 6:20 PM

बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या जीवनाबाबत जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. त्यांचं राहणीमान त्यांच्या आवडीनिवडी या नेहमी चर्चेचा विषय ठरतात.

बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या जीवनाबाबत जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. त्यांचं राहणीमान त्यांच्या आवडीनिवडी या नेहमी चर्चेचा विषय ठरतात. जाणून घेऊयात बॉलिवूडसेलिब्रिटींच्या आवडत्या पदार्थांबाबत...

बॉलिवूडचा भाईजान आपल्या अभिनयाने चाहत्यांना नेहमीच आपलंसं करतो. पण त्याला त्याची आई सलमाने तयार केलेली बिर्याणी भूरळ घालते. आईच्या हातच्या बिर्याणीसारखी चव जगभरात कुठेही सापडणार नाही असं सलमान नेहमीच सांगतो. याशिवाय सलमानला कबाब आणि मोदक फार आवडतात.

बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर आपल्या हटके स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असते. सोनमचा फेव्हरेट पदार्थ चॉकलेट आहे. पण तिला पावभाजीही फार आवडते. याव्यतिरिक्त तिला पंजाबी आणि बंगाली खाद्यपदार्थही फार आवडतात.

तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेल्या हृतिक रोशनला समोसा फार आवडतो. अनेकदा त्याने याबाबत सार्वजनिकरीत्या सांगितलं असून, तो एकाच वेळी डझनभर समोसे आरामात खाऊ शकतो, असा ठाम विश्वास त्याला आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल सध्या हॉलिवूडमध्येही हिट ठरत आहे. असं असलं तरीदेखील प्रियांकाला भारतीय खाद्यपदार्थांची विशेष ओढ आहे. तिनं स्वतः फूडी असल्याची कबुली अनेकदा दिली आहे. तिला पंजाबी खाद्यपदार्थ विशेष आवडतात. त्यातील मख्खे की रोटी आणि सरसो का साग तिला फार आवडतात. याव्यतिरिक्त तिला परदेशी खाद्यपदार्थ विशेष आवडतात.

बॉलिवूडमध्ये मस्तानी म्हणून नावारूपाला आलेली दीपिका आपल्या फिगरसाठीही प्रसिद्ध आहे. मूळची दक्षिण भारतातील दीपिकाला साऊथ इंडियन पदार्थ फार आवडतात. विशेषतः तिला इडली आणि सीफूड फार आवडतात.

आपल्या झिरो फिगरसाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची बेबो करिना कपूर-खानची विशेष चर्चा झाली ती टशन चित्रपटासाठी तिने केलेल्या वेट लॉसमुळे. आपल्या डाएटच्याबाबतीत सिरिअस असलेली करिनाला मात्र इटालियन पदार्थ फार आवडतात.

बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी अक्षय कुमार बॉलिवूडमध्ये येण्याआधी थायलंडमध्ये शेफ म्हणून काम करत होता. त्याचा आवडता पदार्थ थाय इटालियन करी आहे.

किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूख खानला ग्रील्ड चिकन फार आवडते.

बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन आपल्या साधेपणासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आवडीनिवडीही साध्याच आहेत. त्यांना घरगुती पदार्थ फार आवडतात. त्यातील भेंडीची भाजी हा त्यांचा सर्वात आवडता पदार्थ आहे.

धकधक गर्ल माधुरीच्या हास्याने चाहते घायाळ होतात. माधुरीला तिच्या स्वतःच्या रेसिपींमध्ये असलेली क्रिम फिश हा पदार्थ फार आवडतो.

रणबीरला त्याच्या आजीने तयार केलेली जंगली मटन करी फार आवडते.

बॉक्स ऑफिसवर संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट चाहत्यांमध्ये हिट ठरला. वास्तव फेम संजय दत्त यांना चिकन टिक्का फार आवडतो.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसलमान खानअमिताभ बच्चनसोनम कपूरप्रियंका चोप्रादीपिका पादुकोणमाधुरी दिक्षितकरिना कपूरसंजय दत्तरणबीर कपूर