‘बा बुमोशाय बंदुकबाज’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. इंटिमेट सीन्स, शिव्या आणि संवादाने भरलेल्या या ट्रेलरमध्ये नवाझुद्दीन सिद्दिकीचे एक वेगळेच रूप पाहायला मिळतेय. अनेकांसाठी तर ते कमालीचे शॉकिंग आहे. खरे तर नवाझ जेही करतो ते पूर्ण प्रामाणिकपणे करतो. यात इंटिमेट आणि किसिंग सीन्स पाहूनही हेच वाटते. या चित्रपटात नवाझुद्दीनने प्रथमच लिप किसिंग सीन्स आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. नवाझसाठी हा अनुभव कसा होता, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. ट्रेलर लाँचिंगप्रसंगी त्याला विचारण्यात आले, ‘किसिंग सीन्स देतानाचा तुझा अनुभव कसा होता?’. यावर नवाझचे उत्तर आश्चर्याचा धक्का देणारे होते. ‘किसिंग देताना मी प्रचंड नर्व्हस होतो. कारण हा माझा पहिला लिप किस होता. माझ्या करिअरमध्ये असा सीन मी याआधी कधीही दिलेला नव्हता. त्यामुळे मी घाबरलो होतो. पण, नंतर मी एन्जॉय केले. तुम्ही कुठल्याही कामात असता तेव्हा तुमचे लक्ष दुसरीकडे जात नाही,’ असे नवाझ म्हणाला. त्याचे हे उत्तर ऐकून सगळ्यांनाच हसू आवरणे कठीण झाले. नवाझकडून कुणीही अशा उत्तराची अपेक्षाच करू शकत नाही. पण, शेवटी काळासोबत बदलावे लागतेच ना. नवाझुद्दीनने हा बदल स्वीकारला म्हणायचे.
इंटिमेट सीनविषयी नवाझने दिली प्रतिक्रिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:13 AM