Join us

सुव्रत जोशी या लूकमध्ये तरुणींना वाटतो हॉट अँड सेक्सी? पाहा सुव्रतचा हा लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 1:26 PM

'दिल दोस्ती दुनियादारी' आपल्या पहिल्याच मालिकेतून घराघरात पोहचलेल्या सुव्रतचा कोणताही अंदाज रसिकांना भावतो.

ठळक मुद्देसुव्रतची भूमिका असलेले अमर फोटो स्टुडिओ हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे.रंगभूमीवर येतोय ‘शाही पहारेदार’, सुव्रत जोशीचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवरसुव्रत मालिकांसह तो काही रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करतानाही दिसला

'दिल दोस्ती दुनियादारी' ही मालिका रसिकांच्या मनात घर करून आहे. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांचं तुफान मनोरंजन करणारी ठरली. तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या मालिकेतील हे कलाकारही तसेच, तरुण आणि बिनधास्त. त्यामुळे या सगळ्या कलाकारांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. या मालिकेतील एक पात्र म्हणजे सुजय साठे. अभिनेता सुव्रत जोशीने साकारलेला सुजय रसिकांना चांगलाच भावला.

रसिकांमध्ये कलाकारांची स्टाईल, लूक, फॅशन याची प्रचंड उत्सुकता असते. एखाद्या मालिकेत किंवा सिनेमातील कलाकाराची स्टाईल तरूणाईमध्ये कधी फॅशन स्टेटमेंट किंवा स्टाईल स्टेटमेंट बनेल हे सांगणं कठीण. अभिनेत्यांना क्लीन शेव म्हणजेच दाढीविना पाहणं तरूणाईला कायम आवडते. मात्र गेल्या काही वर्षात हा ट्रेंड बदलत असल्याचे दिसतंय. सध्या कलाकारांमध्ये दाढी ठेवण्याचा ट्रेंड दिसून येतो. तरूणाईला तर काही कलाकार फक्त आणि फक्त दाढी लूकमध्येच आवडतात. तर काहींना त्या कलाकाराचे  दाढी आणि विनादाढी हे दोन्ही लूक भावतात. यांत उल्लेख करावा लागेल तो अभिनेता सुव्रत जोशीचा.

आपल्या पहिल्याच मालिकेतून घराघरात पोहचलेल्या सुव्रतचा कोणताही अंदाज रसिकांना भावतो. त्याने दाढी ठेवलेली असो किंवा क्लीन शेव्ह, दोन्ही लूक रसिकांना विशेषतः तरुणींना भावले आहेत. मालिकांसह तो काही रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करतानाही दिसला. यावेळीही त्याचे दोन्ही लूक पाहायला मिळाले. याशिवाय रंगभूमी आणि सिनेमातही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. सध्या सुव्रतची भूमिका असलेले अमर फोटो स्टुडिओ हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. यातील त्याची भूमिकाही नाट्यरसिकांना भावते आहे. लवकरच त्याचे नवं नाटक रंगभूमीवर येत असून त्याच्या या आगामी नाटकाचे नाव शाही पहारेदार असं आहे. नाट्य रसिकांनाही सुव्रतच्या या नाटकाची नक्कीच उत्सुकता असेल.

रंगभूमीवर नाट्य रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलेलं नाटक म्हणजे ‘अमर फोटो स्टुडिओ’. सर्वसामान्यांसह तरुणाईला नाट्यगृहाकडे आकर्षित करण्यात हे नाटक यशस्वी ठरलं. तरुणाईला भावणाऱ्या या नाटकाचे दोनशेहून अधिक यशस्वी प्रयोग झाले आहेत. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सिद्धेश पूरकर, पर्ण पेठे आणि पूजा ठोंबरे अशी तगडी स्टारकास्ट या नाटकातून रसिकांचं मनोरंजन करत आहे. कलाकारखाना' आणि 'सुबक' नाट्य संस्थेला सामाजिक जबाबदारीचे तितकेच भान आहे आणि म्हणूनच 'अमर फोटो स्टुडिओ'ने त्यांच्या नाटकांचे ठाणे आणि बोरिवली मधील प्रयोग हे महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी आयोजित केले होते. 

टॅग्स :सुव्रत जोशीअमर फोटो स्टुडिओ