Join us

Nora Fatehi च्या 'या' Videoने घडविला इतिहास! Fifa World Cup 2022 मध्ये Shakira सोबत परफॉर्म करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 20:49 IST

FIFA World Cup 2022: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ( Nora Fatehi) ही इतिहास घडविणार आहे...

FIFA World Cup 2022: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ( Nora Fatehi) ही इतिहास घडविणार आहे... पुढील महिन्यात कतारमध्ये होणाऱ्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२च्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करणारी ती पहिली भारतीय व्यक्ती ठरणार आहे. फिफाने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओत नोरा फिफाच्या अँथम मध्ये दिसली आहे. वाका वाका हे प्रसिद्ध गाणं  देणाऱ्या शकिरा व जेनिफर लोपेझ यांच्यासह नोरा परफॉर्म करणार आहे. 

फिफाचं अधिकृत गाणं लवकरच रिलीज केलं जाणार आहे. पण, त्यात प्रथमच भारतीय सेलिब्रेटी दिसणार आहे. नोरा सध्या झलक दिखला जा १० मध्ये काम करत आहे. शिवाय अजय देवगण व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या Thank God या चित्रपटातही ती झळकणार आहे.   डिसेंबरमध्ये होणाऱ्या निरोप समारंभातही नोरा परफॉर्म करणार असल्याची चर्चा आहे. २० नोव्हेंबरपासून फुटबॉल वर्ल्ड कपला कतारच्या एल बायत स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.  

टॅग्स :नोरा फतेहीफिफा विश्वचषक २०१८फुटबॉल