बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणजेच हृतिक रोशन(Hritik Roshan)च्या बहुप्रतिक्षित 'फाइटर' (Fighter Movie) चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. बॉलिवूड अभिनेत्याने नुकताच फर्स्ट लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हृतिकचे चाहते याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे या चित्रपटाबाबतची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र दोन कारणांमुळे या फर्स्ट लूकमधील गोष्टी खटकत आहेत. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण यातून गायब आहे. आणि दुसरी बाब म्हणजे फाइटरचा फर्स्ट लूक पाहून लोकांना टॉम क्रूझचा सुपरहिट चित्रपट 'टॉप गन: मॅवेरिक' आठवत आहे. अनेक नेटकऱ्यांनी तर 'फाइटर'चा हा फर्स्ट लूक 'टॉप गन: मॅव्हरिक'सारखा दिसतो, असे म्हटले आहे.
हृतिक रोशनने शेअर केलेल्या फर्स्ट लूकमध्ये तो फाइटर जेट्समध्ये एअरफोर्स सूटमध्ये दिसत आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये 'फायटर'ची रिलीज डेट २५ जानेवारी २०२४ लिहिली आहे आणि आता फक्त ७ महिन्यांची प्रतीक्षा असल्याचे सांगितले आहे.
युजर्स म्हणाले - बॉलिवूडची तीच जुनी सवयहृतिकच्या पोस्टवर चाहते आणि यूजर्सच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सुरुवातीला, सुपरस्टारच्या चाहत्यांनी त्याच्या फर्स्ट लूकला पसंती दर्शवली. पण यानंतर असे काही यूजर्स आले, ज्यांनी त्याची तुलना 'टॉप गन'शी केली. एका यूजरने लिहिले, 'टॉप गनची कॉपी. बॉलिवूडची तीच जुनी सवय. दुसर्या यूजरने लिहिले की, 'फर्स्ट लूक ठीक आहे, संपूर्ण चित्रपटाला टॉप गनची कॉपी बनवू नका.'
सिद्धार्थ आनंद आणि हृतिक रोशन पुन्हा आले एकत्रतशी ही पहिलीच वेळ असेल जेव्हा हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. 'फाइटर' हा देशातील पहिला एरियल अॅक्शन फ्रँचायझी चित्रपट आहे. या चित्रपटात अनिल कपूरही आहे. दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. हृतिक आणि सिद्धार्थच्या जोडीने यापूर्वीच 'वॉर' चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे.