हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) फ्रेश जोडी आणि सोबतीला अनिल कपूर (Anil Kapoor) अशा तगड्या कास्टसह 'फायटर' (Fighter) सिनेमा आज चित्रपटगृहात रिलीज झालाय. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्या प्रेक्षकांनी आता सोशल मीडियावर रिव्ह्यू देण्यास सुरुवात केली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमामुळे प्रेक्षक खूपच प्रभावित झाले आहेत. 'मेगा ब्लॉकबस्टर', 'सुपर अॅक्शन फिल्म' आणि टॉप लेवल सिनेमॅटोग्राफीमुळे सिनेमा सोशल मीडियावर हिट आहे.
सिद्धार्थ आनंद यांचा आतापर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा म्हणत प्रेक्षकांनी दिग्दर्शकाचं कौतुक केलं आहे. सिनेमा थिएटरमध्ये पाहण्यासारखाच आहे. हृतिकचा अभिनय नेहमीप्रमाणेच नेक्स्ट लेव्हल आहे. तसंच त्याची आणि दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. पहिला भाग फारच भावनिक आहे तर दुसऱ्या भागात अॅक्शनने मजा आली आहे. एकंदर हॉलिवूड लेव्हलची फिल्म असल्याचीही काही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या बदल्याची ही कहाणी आहे. पाकिस्तानात घुसून त्यांच्यावर कसा हल्ला करण्यात आला हे यामध्ये दाखवण्यात आलं आहे. मात्र यात अनेक ट्विस्ट अँड टर्न्सही आहेत. हृतिक फायटर पायलट आहे, तर अनिल कपूर सीनिअर आहे. दीपिकाही पायलट आहे मात्र तिचे कुटुंब तिच्यावर नाराज असते. देशभक्ती जागी करणारी सिनेमाची कहाणी आहे. तर सर्वच कलाकरांचा परफॉर्मन्स दमदार असल्याचे रिव्ह्यू सोशल मीडियावर आले आहेत.