Join us

महिला सक्षमीकरणावर आधारित चित्रपट 'भोर'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 8:03 PM

'भोर' चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंगचा चित्रपट 'भोर' एमएक्स प्लेयरवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात महिला सक्षमीकरणाच्या जोरदार छटा दाखवल्या आहेत आणि त्याचबरोबर एकाच वेळी ग्रामीण भारतातील स्वच्छताविषयक बाबींबरोबरच जातीव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह म्हणाले कि, "एक चित्रपट निर्माता आणि सामाजिक कार्य विद्यार्थी म्हणून मला भारतभर तसेच जगातील इतर देशांत विस्तृत प्रवास करण्याची संधी मिळाली. मला देशी संस्कृतीतील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. समाजाबाबत त्यांचा वेगळा समज आहे, ते गरीब असले तरी ते आनंदी आहेत,  त्यांचे जीवन संघर्षमय आहे मात्र गुंतागुंतीचे नाही".

ते पुढे म्हणाले, "भोर बिहारमधील 'मुसहर' या नावाच्या एका समुदायाशी संबंधित आहे. ते एक साधे लोक आहेत आणि भारतातील स्वच्छता आणि शौचालयांवरील आधुनिक मोहिमेवर ते काय प्रतिक्रिया देतात याबद्दल आमची कथा आहे. त्यांच्या जीवनाचे वास्तव चित्रित करण्याबरोबरच शक्य तितके सत्य वाटू देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न केले आहेत".

'कैरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल', 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' (जीओए), इंडो - बर्लिन फिल्म वीक (बर्लिन), मेलबर्न इंडिया फिल्म फेस्टिव्हल, ऑस्ट्रेलिया यासह तीसहून अधिक चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाचे समीक्षण झाले आहे. या चित्रपटाला ओटावा इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि बोस्टनच्या कॅलेडोस्कोप इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन पुरस्कारही मिळाले होते.

'भोर' ची निर्मिती ज्ञानेश फिल्म्सच्या ए के सिंह यांनी केली आहे आणि कामाख्या नारायण सिंह हे दिग्दर्शक आहेत.बिहारमधील मुसहर समुदायामधील बुधनी या मुलीच्या आसपास हा चित्रपट फिरतो. कायद्याप्रमाणे तिचे लग्नाचे वय नसूनदेखील तिचा विवाह करण्याबाबतच्या गोष्टी. तिचे शिक्षण घेण्याचे स्वप्न आणि स्वच्छतेसाठी, शौचालय बांधण्यासाठी सर्व बाधा कशा पार पाडतात, व समाजाबरोबर कशी झुंज लढवतात यावर हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये नलनीश नील, देवेश राजन, सवेरी श्री गौर आणि पुण्य प्रसून बाजपेयी यांचा कलाकारांचा समावेश आहे.

टॅग्स :एमएक्स प्लेअर