सुबोध भावेचा ‘फुगे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्याच्या आणि स्वप्निलच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात त्याच्या लहानपणाची भूमिका त्याचाच मुलगा मल्हार याने साकारली होती. पण आता पहिल्यांदाच सुबोध आणि त्याचा मुलगा एका चित्रपटात झळकताना दिसणार आहे. आता मल्हारनंतर सुबोधचा दुसरा मुलगा कान्हा चित्रपटात काम करणार आहे. अबडबमच्या यशानंतर अबडबम 2 बनवला जाणार असून या चित्रपटात प्रेक्षकांना ही बाप-लेकाची जोडी पाहायला मिळणार आहे. ही बातमी स्वत: सुबोधनेच त्याच्या चाहत्यांना दिली आहे. सुबोधने ट्विट करून म्हटले आहे, की मी पहिल्यांदाच माझा मुलगा कान्हा याच्यासोबत काम करणार आहे. मला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. अगडबम 2 या चित्रपटात आम्ही झळकणार आहोत. अगडबम या चित्रपटात तृप्ती भोईर, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तृप्तीने या चित्रपटात अतिशय जाडजूड अशा एका मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची निर्मितीदेखील तृप्तीनेच केली होती तर सतिश मोतलिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
सुबोध मुलासोबत चित्रपटात
By admin | Published: March 28, 2017 4:41 AM