ठळक मुद्देजान्हवी कपूरने ‘घूमर’ गाण्यावर मनमोहन नृत्य सादर केले आणि फिल्मफेअरची रात्र आणखी ‘रंगीन’ झाली.
फिल्मफेअर अवार्डमध्ये यंदा काही वेगळाच नजारा पाहायला मिळाला. होय, काल रात्री रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी आलिया भट आणि सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावावर करणाऱ्या रणबीर कपूरची. आलियाला ‘राजी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
हा पुरस्कार घेताना आलिया भावूक झाली. यावेळी स्टेजवर दिलेल्या भाषणात आलियाने चक्क रणबीर कपूरवरच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आणि सगळेच अवाक् झालेत. ‘मेघना, माझ्यासाठी ‘राजी’ तू आहे. तू या चित्रपटासाठी घाम-रक्त आटवलेस. विकी तुझ्याशिवाय हा चित्रपट पूर्णच झाला नसता. माझा मेंटर करण जोहर आणि पापा तुम्हा सगळ्यांचे आभार. आजची रात्र माझ्या पे्रमासाठी, माझ्या ‘खास’साठी, आय लव्ह यू...,’असे आलिया म्हणाली.
रणबीर कपूरला पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्याने सर्वप्रथत त्याच्या अगदी बाजूला बसलेल्या आलियाला किस केला. नंतर एक्स गर्लफ्रेन्ड दीपिका पादुकोणला हग केले आणि नंतर तो स्टेजवर गेला.
शाहरुख खानच्या कॉमेडीने फिल्मफेअर पुरस्कारात रंग भरले. ‘माझे आयडल अमिताभ बच्चन यांच्यासारखी हाईट मिळवण्यासाठी मी काय काय नाही केले. मी लटकलो, खूप काही केले. पण त्यांच्याइतकी ‘हाईट’ मिळवू शकलो नाही. मी आईजवळ गेलो आणि आई मी खूप काही केले पण अमिताभ यांच्याइतका उंच बनू शकलो नाही, असे तिला म्हणालो. त्यावेळी आई मला म्हणाली ते आजही माझ्या स्मरणात आहे. शरीराने त्यांच्या इतका उंच बनू नकोस तर कामातत्यांच्याइतकी उंची गाठ,असे आई मला म्हणाली.’
जान्हवी कपूरने ‘घूमर’ गाण्यावर मनमोहन नृत्य सादर केले आणि फिल्मफेअरची रात्र आणखी ‘रंगीन’ झाली.