Join us

अखेर Kapil Sharma ने मुलाचे नाव केले जाहीर,  या देवाशी आहे नावाचे कनेक्शन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 15:26 IST

Kapil Sharma named his boy after name of Lord Krishna, कपिलने मुलाचे नाव काय ठेवले असाही प्रश्न विचारला, त्यावर कपिलने उत्तर देत पहिल्यांदाच सोशल मीडियावर  आपल्या मुलाचे नाव सांगितले आहे. कपिलने मुलाचे नाव त्रिशान ठेवलं असल्याचे सांगितले आहे. 'त्रिशान' हे भगवान कृष्णाचे नाव आहे.

कपिल दुसऱ्यांदा बाबा होताच त्याने लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून  चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली होती. यानंतर असंख्य चाहत्यांनी कपिल शर्मावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तर दुसरीकडे काहींनी  त्याला ट्रोलही केली होते.

दुस-या मुलाची इतकी घाई काय होती? असे एक ना अनेक प्रश्न विचारून ट्रोलर्सने कपिलला ट्रोल केले होते. त्यांनतर कपिल फारसे काही कुटुंबाबद्दल जस्टकाही माहिती शेअर करत नाही.कपिलच्या मुलाचे नमकरणही झाले तरीही मुलाचे नाव काय ठेवले हे गोष्ट त्याने सांगितली नव्हती.

नुकताच कपिलचा वाढदिवस झाला, सोशल मिडियाद्वारे अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  यावेळी गायिका नीति मोहननेही त्याला शुभेच्छा दिल्याच त्याचदरम्यान कपिलने मुलाचे नाव काय ठेवले असाही प्रश्न विचारला, त्यावर कपिलने उत्तर देत पहिल्यांदाच सोशल मीडियावर  आपल्या मुलाचे नाव सांगितले आहे. कपिलने मुलाचे नाव त्रिशान ठेवलं असल्याचे सांगितले आहे. 'त्रिशान' हे भगवान कृष्णाचे नाव आहे.

निती मोहनही लवकरच आई होणार आहे. ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार. अलीकडेच तिने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. इन्स्टाग्रामवर तिने बेबी बॅम्प फ्लॉन्ट करतानाचे पती निहार पांड्यासोबतच काही खास फोटो शेअर केले होते. 

 

टॅग्स :कपिल शर्मा नीति मोहन