मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे १६ डिसेंबर, २००४ साली अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती. मराठी चित्रपट, त्यातील कलाकार, तंत्रज्ञ यांना नेहमीच मदत करण्याचे काम लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते. त्यांचे हे कार्य अविरत सुरू राहावे यासाठी बेर्डे कुटुंबियांनी त्यांच्या १७ व्या स्मृतीदिनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे आणि त्यांची मुले अभिनय आणि स्वानंदी बेर्डे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत लक्ष्य कला मंचची स्थापना केली आहे. याबाबत प्रिया बेर्डे यांनी पोस्ट शेअर केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, १६ डिसेंबर २०२१ रोजी लक्ष्मीकांतच्या १७व्या पुण्यतिथी निमित्त "लक्ष्य कला मंच"ची स्थापना झाली. गेली १७ वर्ष आम्ही ही संस्था उभारण्याचा आणि लक्ष्मीकांत ची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण अनेक अडचणी, मनुष्यबळाचा अभाव इ. गोष्टींना तोंड देत प्रयत्नांनती परमेश्वर या नुसार आम्ही यशस्वी झालो.
कलेवरच्या प्रेमासाठी व कलाकारांच्या हक्कासाठी एकत्र येऊहा मंच स्थापन करण्यात ज्यांचा मोठा आणि महत्वाचा वाटा आहे ते म्हणजे माझे सहकारी व बिझनेस पार्टनर श्रीमंथ एंटरटेनमेंट प्रा.ली व धनंजय माने इथंच राहतातचे निर्माते, पोलीस बॉईज ऑर्गनायझेशन चे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष, ग्राहक सेवा संस्था चे कार्याध्यक्ष, हॉटेल मराठमोळा झटका व हॉटेल चख लेचे मालक अमर गवळी, सौ. सायली अमर गवळी, शैलेंद्र परदेशी, माझे संपर्क प्रमुख आणि सल्लागार धनंजय वाठारकर, संतोष जी साखरे हे होत. महाराष्ट्रातल्या तमाम कलाकारांना आमचे आवाहन आहे की त्यांनी लक्ष्य कला मंच मध्ये सामील व्हावं, "कलेवरच्या प्रेमासाठी व कलाकारांच्या हक्कासाठी " आपण एकत्र येऊ. लवकरच वेबसाईट व हेल्पलाईन नंबर येईल. अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क साधावा. धनंजय वाठारकर- 8888440058, असे त्यांनी सांगितले.