Join us

'तेनाली रामा' मालिकेच्या सेटवर अग्नितांडव, शूटिंग सुरू होतं अन्...; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 09:20 IST

शोचं शूटिंग सुरू असतानाच 'तेनालीरामा' मालिकेच्या सेटवर आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अनेक गाजलेल्या मालिका आणि टीव्ही शोपैकी सोनी सब चॅनेलवरील 'तेनाली रामा' हा लोकप्रिय शो आहे. अलिकडेच या शोचा दुसरा भाग सुरू करण्यात आला होता. मात्र, या शोचं शूटिंग सुरू असतानाच 'तेनालीरामा' मालिकेच्या सेटवर आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी(२ मार्च) मालिकेच्या सेटवर अग्नितांडव पाहायला मिळालं. 

मालिकेच्या सेटच्या मागच्या बाजूला आग लागली होती. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत होती. पण, प्रसंगावधान साधत मालिकेचं शूटिंग तातडीने बंद करण्यात आलं. आणि आग लागल्याची माहिती फायर ब्रिगेडला देण्यात आली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या संपूर्ण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दोन तास मालिकेचं शूटिंग बंद ठेवण्यात आलं होतं. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मालिकेचं शूटिंग पुन्हा सुरू झालं. या आगीत मालिकेच्या सेटचं थोड्या फार प्रमाणात नुकसान झालं आहे. 

'तेनाली रामा' मालिकेत अभिनेता कृष्णा भारद्वाज मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत तो तेनाली रामाच्या भूमिकेत आहे. २०१७ मध्ये ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेला मिळालेली लोकप्रियता आणि प्रेक्षकांच्या आग्रहास्तव २०२४ मध्ये 'तेनाली रामा'चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसोनी सबआग