Join us

जान्हवी-ईशान हिट, धडकची सैराट ओपनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 5:24 PM

मराठीतील नागराज मंजुळे दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट सैराट याचा हिंदी रिमेक असलेला धडक हा चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सैराटशी या चित्रपटाची तुलना करण्यात येत होती.

मराठीतील नागराज मंजुळे दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट सैराट याचा हिंदी रिमेक असलेला धडक हा चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सैराटशी या चित्रपटाची तुलना करण्यात येत होती. रिलिजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 8.71 रूपयांची कमाई करून सर्वांना धक्काच दिला आहे. धडक देशात एकूण 2235 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला असून दिग्दर्शक शशांक खेतान यांचे दिग्दर्शन असलेला मराठी चित्रपट सैराटचा ऑफिशिअल रिमेक आहे. विशेष म्हणजे नवख्या स्टार कास्टला घेऊन तयार करण्यात आलेला आणि करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाने करण जोहरच्याच ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडला आहे. 2012मध्ये प्रदर्शित झालेला ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून करणने वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट या नवख्या स्टार्सना लॉन्च केलं होतं. तर या चित्रपटातून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि इशान खट्टर या दोघांना लॉन्च केलं आहे. 

मराठी चित्रपट सैराटचा रिमेक असल्यामुळे धडकची तुलना सैराटशी होणं स्वाभाविकच होतं. या चित्रपटाती कथी ही सारखीच आहे. फक्त कथेला दिलेली पार्श्वभूमी आणि टिपिकल बॉलिवूड टच यामुळे सैराटपेक्षा वेगळा ठरतो. कथा तिच असली तरी भव्य दिव्य सेट, राजस्थानी महाल-कोठ्या, मध्यमवर्गीय जीवनशैली, राजस्थानी संस्कृती, भाषा, परंपरा अशा अनेक गोष्टी धडकला वेगळं ठरवण्याचं काम करतात. तरिदेखील सैराटमध्ये आर्चीनं प्रेक्षकांची मनं जिंकली, पण धडकमध्ये मात्र जान्हवीला तेवढं जमलेलं दिसत नाही. त्यापेक्षा धडकमध्ये मधु म्हणजे इशान भाव खाऊन जातो. त्याचा गोड आणि भाबडा स्वभाव प्रेक्षकांची मनं जिंकतो. 

सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘संजू’ आणि ‘सूरमा’ हे दोन चित्रपटही सुरु आहेत. संजूने तीन आठवड्यांमध्ये 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तेच 13 जुलै रोजी प्रद्रशित झालेल्या ‘सूरमा’ चित्रपटाने बुधवारपर्यंत 21.21 कोटी रूपयांचा गल्ला केला. आता हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे की, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाईच्याबाबतीत कुठपर्यंत धडक देतोय.

टॅग्स :बॉलिवूडधडक चित्रपटजान्हवी कपूरइशान खट्टर