ऑस्कर 2024 (Oscar 2024) साठी भारताकडून '2018-एवरीवन इज अ हिरो' (2018 Everyone is a hero) या मल्याळम सिनेमाची एंट्री झाली आहे. दिग्दर्शक जुड एंथनी जोसेफ यांचा हा सिनेमाऑस्कर एंट्रीमुळे चर्चेत आलाय. अनेक लोकांना सिनेमा पाहण्याची इच्छा असेलच. ही एक मल्याळम फिल्म आहे. तरी आनंदाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा हिंदीतही डब झाला असून ओटीटी माध्यमावर उपलब्ध आहे.
यावर्षी रिलीज झालेल्या '2018' सिनेमाचं सध्या कौतुक होतंय. रिलीजनंतर एका आठवड्यातच सिनेमा हिंदीत डब झाला होता. कारण त्याआधी 'कांतारा' सिनेमाने हिंदीतही धुमाकूळ घातला होता. हा सिनेमा हिंदीतही थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता मात्र तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर सिनेमा ओटीटीवर आला. विशेष म्हणजे मल्याळममध्ये या सिनेमाने सर्व रेकॉर्ड्स तोडले होते आणि सर्वात जास्त कमाई करणारा मल्याळम सिनेमा बनला होता. हा एक मल्टीस्टारर सर्व्हायव्हल ड्रामा आहे. मे महिन्यात सिनेमा रिलीज झाला होता तर सिनेमाने वर्ल्डवाईड २०० कोटी रुपयांची कमाई केली होती.
बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर '2018-एवरीव्हन इज अ हिरो' हा सिनेमा जूनमध्ये ओटीटीवर आला. सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो सध्या उपलब्ध आहे. हिंदीसह, तेलुगू, कन्नड आणि तमिळ भाषेतही आहे. केरळमध्ये आलेल्या विनाशक पुरावर सिनेमाची कहाणी आधारित आहे. या पुरात सामान्य माणसांच्या साहसाच्या अनेक कथा दाखवण्यात आल्या आहेत.नेसर्गिक आपत्तीत अडकलेले लोक कसे त्यातून मिळूनमिसळून बाहेर पडतात हे त्यात दाखवलं आहे.