Join us

सोनम कपूरच्या मुलाची पहिली झलक, ६ महिन्यांचा झाला 'वायू'; लेकाचा क्यूट व्हिडिओही केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 12:45 PM

सध्या सेलिब्रिटी 'नो फोटो पॉलिसी'ला फॉलो करत असतानाच सोनमने लेकाची झलक सोशल मीडियावर दाखवली आहे.

अभिनेत्री सोनम कपूर बऱ्याच वर्षांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. सोनम मध्यंतरी पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये वास्तव्यास होती. सहा महिन्यांपूर्वीच तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्याचे नाव 'वायू' असे आहे. सध्या सेलिब्रिटी 'नो फोटो पॉलिसी'ला फॉलो करत असतानाच सोनमने लेकाची झलक सोशल मीडियावर दाखवली आहे. वायू आज ६ महिन्यांचा झाला असल्याने तिने एक क्यूट व्हिडिओ तिने शेअर केला आहे.

सोनम कपूरने पहिल्यांदाच वायूची झलक दाखवत एक फोटो आणि एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फोटोमध्ये सोनम वायूला मांडीवर घेऊन बसलेली आहे. त्याच्या हातात एक खेळणं असून सोनम त्याला खेळवताना दिसत आहे. तर पुढे पोस्ट केलेल्या व्हिडिओत वायूला पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. तो बेडवर रांगण्याचा प्रयत्न करतोय तसेच त्याच्या आजुबाजुला बरीच खेळणी बघायला मिळत आहेत. या पोस्टवर सोनमने तितकेच खास कॅप्शनही लिहिले आहे. ती लिहिते, 'वायू ६ महिन्यांचा झाला आहे. हे सर्वात छान काम आहे. मला मिळालेला सर्वात सुंदर आशिर्वाद...बेटा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे...तुझ्या वडिलांनी आणि मी याहून जास्त काही मागितलं नाही.'

सोनमच्या यो पोस्टवर काही मिनिटांतच लाखो लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही या पोस्टला लाईक केले आहे तर कमेंट्सही केल्या आहेत. नुकतीच आई झालेली बिपाशा बासू हिनेही 'गॉड ब्लेस क्यूटी' अशी कमेंट केली आहे. तर सर्वात लक्षवेधक कमेंट म्हणजे वडील आनंद आहुजाची. 'पजामा पार्टी'अशी कमेंट त्याने केली आहे. 

सध्या सोनम कपूर वायू च्या देखभालीत व्यस्त आहे. ती परत सिनेमात काम करणार की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. सध्या ती केवळ मातृत्व एंजॉय करत आहे.

टॅग्स :सोनम कपूरपरिवारअनिल कपूरसोशल मीडियाव्हायरल फोटोज्