Join us

First Look: अभिनेता फरहान अख्तर "लखनऊ सेंट्रल"मध्ये कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 1:34 PM

बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता फरहान अख्तरचा आगामी सिनेमा ""लखनऊ सेंट्रल""ची पहिली झलक रिलीज करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता फरहान अख्तरचा आगामी सिनेमा ""लखनऊ सेंट्रल""ची पहिली झलक रिलीज करण्यात आली आहे. स्वतः फरहान अख्तरनं सिनेमासंबंधीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर ""लखनऊ सेंट्रल""चा फोटो शेअर करत फरहान अख्तर असे लिहिले आहे की, ""यह है किशन मोहन गिरहोत्रा...जेल में इसे 1821 बुलाते है !"" 
 
""लखनऊ सेंट्रल"" सिनेमासंबंधी रिलीज करण्यात आलेल्या या पहिल्या पोस्टरमध्ये फरहानच्या हातात पाटी दिसत आहे. ज्यावर "नाम - किशन मोहन गिरहोत्रा, कैदी नं.1821 दिनांक 24.07.2017", असे लिहिलेले आहे.  फरहाननं ट्विटरदेखील हा फोटो शेअर केला आहे.
 
""लखनऊ सेंट्रल"" सिनेमाचं दिग्दर्शन रंजीत तिवारीनं केले आहे. या सिनेमाच्या निमित्तानं तिवारी यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे. या सिनेमामध्ये अभिनेत्री डायना पेन्टीची महत्त्वाची भूमिका आहे.  या सिनेमामध्ये फरहान एका हत्येच्या गुन्ह्यांतर्गत जेलमध्ये शिक्षा भोगत असतो.
 
आणखी बातम्या वाचा
बहुतेक वेळा एखादी व्यक्ती अशा परिस्थिती अडकते, जेथून त्या व्यक्तीला बाहेर पडणं कठीण असते. किशनदेखील अशाच स्थिती फसला आहे. तो एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. मात्र तो निर्दोष आहे का? याचे उत्तर सिनेमा रिलीज झाल्यानंतरच मिळू शकणार आहे. किशनला जेलमध्ये ठेवावं की त्याची मुक्तता करण्यात यावी, या कोर्टाच्या निर्णयावर सिनेमाची कहाणी आधारित आहे.  किशन मुरादाबाद येथील रहिवासी असून त्याला गायक होण्याची इच्छा असते.