Join us

क्रिकेटची बॅट अन् लोकांचा जयजयकार! राम चरणच्या 'पेड्डी' सिनेमाची पहिली झलक एकदा बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:24 IST

राम चरणचा आजवर कधीही न पाहिलेला अवतार 'पेड्डी' सिनेमातून बघायला मिळतोय. बातमीवर क्लिक करुन बघा पहिली झलक (peddi, ram charan)

गेल्या अनेक दिवसांपासून ग्लोबल स्टार राम चरणचा (ram charan) बहुप्रतिक्षित चित्रपट 'पेड्डी'ची (peddi) चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या दोन आकर्षक फर्स्ट लूक पोस्टर्सची मोठी चर्चा निर्माण केली आहे. श्रीराम नवमीच्या शुभ मुहूर्तावर (काल) निर्मात्यांनी 'पेड्डी' चित्रपटाचा पहिला शॉट लाँच केला आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली. टीझरसारख्या दिसणाऱ्या या फर्स्ट शॉटमध्ये राम चरणचा आजवर न पाहिलेला रावडी अंदाज बघायला मिळतोय.

'पेड्डी' चित्रपटाचा पहिला शॉट

'पेड्डी' चित्रपटाचा पहिला शॉट एका प्रभावी सीनने सुरू होतो जिथे पेड्डीसाठी प्रचंड गर्दी असते अन् त्याचा जयजयकार सुरु असतो. त्यानंतर राम चरणची शानदार एन्ट्री होते. खांद्यावर बॅट आणि तोंडात सिगार घेऊन क्रिकेट मैदानावर आत्मविश्वासाने राम चरण चालताना दिसतो. राम चरणची डायलॉग डिलिव्हरी आणि बॅकग्राऊंडला असलेलं संगीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. शेवटच्या सीनमध्ये प्रचंड ताकद लावून क्रीजमधून बाहेर पडून बॅटच्या हँडलला जमिनीवर मारणे आणि नंतर चेंडू बाऊंड्रीबाहेर पाठवणे, हा उत्कंठावर्धक क्षण आहे.

कधी रिलीज होणार पेड्डी

'पेड्डी' या चित्रपटात राम चरणसोबत जान्हवी कपूर, शिवा राजकुमार, जगपती बाबू आणि दिव्येंदु शर्मा हे कलाकारही झळकणार आहेत. 'पेड्डी' हा चित्रपट बुची बाबू सना यांनी लिहिला असून दिग्दर्शितही केला आहे. मैथ्री मूव्ही मेकर्सने सुकरम रायटिंग्जच्या सहकार्याने हा चित्रपट प्रेझेंट केला आहे. या चित्रपटाला दिग्गज ए.आर. रहमान यांचे संगीत आहे आणि आर. रत्नवेलू यांचे छायाचित्रण आहे. २७ मार्च २०२६ ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांना आणखी वर्षभर या सिनेमाची वाट पाहावी लागेल.

टॅग्स :राम चरण तेजाआरआरआर सिनेमाTollywoodबॉलिवूड