हनीमूननंतर आता सेलिब्रेटींमध्ये बेबीमूनला जाण्याचा नवा ट्रेंड सुरु झालाय. सेलिब्रिटी कपल्समध्ये याची क्रेझ जास्त दिसून येतेय. अगदी त्याचप्रमाणे कॉमेडीचा बादशाह कपिल शर्माने बिझी वर्क शेड्युलमधून वेळ काढत गर्भवती पत्नीला आराम मिळावा तसंच तिच्यासह रम्य आणि आनंददायी क्षण एकत्र घालवण्यासाठी हे लव्हबर्ड्स बाहेर फिरायला निघालेत. नुकतेच एअरपोर्टवर कपिल शर्मा पत्नी गिन्नीसह स्पॉट झाला. शेअऱ झालेल्या फोटोत गिन्नीच्या चेह-यावर एक वेगळाच ग्लो दिसत होता.
तसेच तिचे बेबी बम्पही दिसतायेत. त्यामुळे गिन्नीही प्रेग्नंट असल्याचे कपिल शर्माने सांगितले नसले तरी या दोघांच्या चेह-यावरचा आनंदच सा-यांना घरी येणा-या नवीन पाहुण्याची चाहुल देत आहे. नव्या पाहुण्याचं आगमन होण्याआधी कपिल आपल्या लेडी लव्हसाठी खास कॅनडाला बेबीमूनचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. कॅनाडामध्ये दोघेही लग्नानंतर निवांत आणि सुखद क्षण एन्जॉय करणार आहेत.
गिन्नी बऱ्याचदा 'कपिल शर्मा' शोच्या सेटवर उपस्थित असते आणि तिथे कपिलची काळजी देखील ती घेत असते. आता ती प्रेग्नेंट असल्यामुळे ती सेटवर येत असते. तिच्या कुटुंबियांना वाटते की, कपिलने जालंदरमध्ये गिन्नीसोबत राहावे. इतकेच नाही तर त्याच्या आईला देखील गिन्नीसोबत प्रेग्नेंसीच्या काळात रहायचे आहे. सध्या गिन्नीही मुंबईत कपिलसह राहात नसून ती जालंदरमध्ये राहात आहे.
गिन्नी चतरथ ही कपिलची बालपणाची मैत्रीण आहे. डिसेंबर, २०१८मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले होते. या विवाह सोहळ्याला टेलिव्हिजन व बॉलिवूडमधील कलाकारांना निमंत्रण दिले होते. आपल्या कॉमिक टाइमिंगने कपिल शर्माने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. 'किस किसको प्यार करूं' या चित्रपटातून कपिलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो 'फिरंगी' या चित्रपटातही पहायला मिळाला.
त्याच्या चाहत्यांनी त्याच्या सिनेमांना हवी तितकी दाद दिली नाही. २००७ साली कॉमेडी रिएलिटी शो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने कित्येक शोजमध्ये काम केले.