Join us

'तडप'मधील पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' झाले लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 15:28 IST

अहान शेट्टी अभिनित 'तडप'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

अहान शेट्टी अभिनित 'तडप'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अहान त्याच्या पहिल्या चित्रपटात तारा सुतारियासोबत दिसणार आहे आणि चित्रपटाच्या रॉ आणि इंटेन्स ट्रेलरने प्रत्येकाला कथेशी जोडले आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे, ज्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे.

'तडप'चे पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' आज धनत्रयोदशीला रिलीज झाले असून अहानने त्याच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. त्याने गाण्याची एक छोटी क्लिप पोस्ट केली असून क्लिपमध्ये तो आणि तारा चुंबन घेताना आणि रोमांचक क्षण एकत्र घालवताना दिसतात. मात्र, पुढच्याच क्षणी कोणीतरी त्यांना ओढून एकमेकांपासून दूर करतात. त्याची बाईक देखील पेटवली जाते. एकूणच या गाण्याने चाहत्यांना चित्रपटांविषयी अतिशय उत्सुक केले आहे.

'तडप' ही एक लव्हस्टोरी आहेतडपचा ट्रेलर पाहिल्यावर समजते की ही एक लव्हस्टोरी आहे. या चित्रपटात ताराने रमिशा नामक मुलीची भूमिका साकारली आहे तर अहानने ईशान नामक पात्र जिवंत केले आहे. दोघंही एकमेकांना खूप प्रेम करतात. पण अचानक दोघांच्या लव्हस्टोरीत एक वळण येते, असे दाखवण्यात आले आहे. 

तडप या दिवशी येणार भेटीलाअहान शेट्टीच्या मोठ्या बॉलीवूड पदार्पणासोबतच, हा तेलगू ब्लॉकबस्टर ‘आरएक्स १००’ चा अधिकृत हिंदी रिमेक असून थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मोठा रोमँटिक ड्रामा आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित, फॉक्स स्टार स्टूडियोजद्वारे प्रस्तुत आणि सह-निर्मित, रजत अरोरा लिखित आणि मिलन लुथरिया दिग्दर्शित, नाडियाडवाला ग्रॅंडसन एण्टरटेनमेंट प्रॉडक्शन 'तडप' ३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :अहान शेट्टीतारा सुतारिया