Join us

अंधश्रद्धेविरोधात आनंदीचे पहिले पाऊल!

By admin | Published: June 25, 2017 2:50 AM

एका मालिके मध्ये अण्णा यांची व्यक्तिरेखा विक्रम गोखले साकारत असून आनंदीची व्यक्तिरेखा मैथिली साकारत आहे. तिचे निरागस प्रश्न

एका मालिके मध्ये अण्णा यांची व्यक्तिरेखा विक्रम गोखले साकारत असून आनंदीची व्यक्तिरेखा मैथिली साकारत आहे. तिचे निरागस प्रश्न, हुशारी मालिकेतील अनेक प्रश्न सोडवत असून आणि प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडत आहे. बळी देण्याची प्रथा खरे तर अत्यंत अमानुष असते. पण, एखाद्या प्राण्याचा, पक्ष्याचा बळी दिला, की अमुक गोष्ट होते, असा अनेकांचा समज असतो. बऱ्याच लोकांनी या प्रथेविरोधात आवाजदेखील उठवला आहे. पण, अजूनही ही प्रथा आपल्या समाजात अस्तित्वात आहे. याच प्रथेविरोधात चिमुकली आनंदी आवाज उठवणार आहे. गावामध्ये पाण्याची टंचाई आहे. पाऊस खूपच कमी पडतोे. त्यामुळे गावातीलच बिर्जे नावाच्या माणसाने ‘यावर्षी पाऊस चांगला पडला, तर मी कोकराचा बळी देईन,’ असा नवस बोलला आहे. पाऊस पडावा म्हणून बिर्जे कोकराचा बळी देणार, ही गोष्ट संपूर्ण गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. अण्णांच्या कानावर देखील ही बाब आली आहे, त्यांना या गोष्टीचा खूप रागदेखील आला आहे. गावामधलाच एक मुलगा, जो आनंदीचादेखील मित्र आहे तो तिला ही गोष्ट सांगतो. आनंदीला ही गोष्ट चुकीची वाटते आणि सोनूच्या मदतीने ती त्या निष्पाप कोकराचा जीव वाचवते. आनंदी आणि अण्णा बिर्जेला समजवून सांगतात, की एका निष्पाप जिवाचा बळी देऊन हे सगळे साध्य होईल, असे तुला वाटते का तर हे चुकीचे आहे. हे सर्व ऐकून बिर्जेलादेखील त्याची चूक कळते. एका जिवाचा बळी देणे हे चुकीचे आहे, हे त्याला पटते. या मालिकेद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.