Join us

दिग्दर्शकाचं चोरलेलं मेडल चोराने परत आणून दिलं, घराबाहेर ठेवली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 15:08 IST

एम मनीकंदन या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाच्या बाबतीत अजब प्रकार घडलाय

काही दिवसांपुर्वी बातमी समोर आली की, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक एम मनीकंदन यांच्या घरात चोरी झाली. यावेळी चोराने तब्बल १ लाख रुपये रोख रक्कम आणि पाच सोन्याची नाणी लंपास केली. चोराने मनीकंदन यांंचं राष्ट्रीय पुरस्काराचं मेडलही चोरलं होतं. पण आता मिळालेल्या माहितीनुसार, चोराने मनीकंदन यांचं राष्ट्रीय पुरस्काराचं मेडल त्यांना परत दिलंय. यासोबत एक चिठ्ठीही लिहीली आहे. 

झालं असं की... ८ फेब्रुवारीला मनीकंदन यांच्या घरी चोरी झाली. त्यानंतर मनीकंदन यांनी पोलिसात तक्रारही नोंदवली.  चोराचा तपास लागला नव्हता. पण आता चोराने एका पिशवीत मनीकंदन यांचं मेडल परत दिलंय.  याशिवाय एका कागदावर त्याने माफीनामाही दिलाय. यात त्याने लिहीलंय की, "सर मला माफ करा. तुमची मेहनत केवळ तुमची आहे. त्यावर आमचा हक्क नाही."

सध्या या घटनेची चांगलीच चर्चा आहे.  पोलिसांनी सांगितलं की, "मनीकंदन घरी नसताना चोरांनी त्यांच्या घरी चोरीचा डाव साधला. त्यांचे रोख रक्कम आणि दागिने चोरीला गेले. आता पोलीस चोराचा तपास करत आहेत." मनीकंदन यांचा तामिळ सिनेमा 'Kaaka Muttai' (The Crow's Egg) ला 'बेस्ट चिल्ड्रेन्स फिल्म' साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय २०२२ साली विजय सेतुपतीची भूमिका असलेला 'Kadaisi Vivasayi' ला सुद्धा लोकांचं चांगलं प्रेम मिळालं.

 

टॅग्स :Tollywoodराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार