लवकरच फुलराणी सायना नेहवालच्या जीवनावर सायना सिनेमा २६ मार्चला रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. यांत अभिनेत्री परिणिती चोप्रा प्रमुख भूमिका साकारणार आहे. सायनाच्या भफिटनेस आणि ट्रेनिंगवर ती अधिक लक्ष दिले.
रुपेरी पडद्यावरील सायना आणि रिअल सायनामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर वाटू नये असं अमोल गुप्तेंची इच्छा होती. यांत थोडा जरी फरक वाटला तर सिनेमाला त्याचा फटका बसेल.या एका कारणामुळेच या सिनेमातून अभिनेत्री श्रद्धा कपूरची एक्झिट झाल्याचे बोलले गेले.
एका खऱ्याखुऱ्या बॅडमिंटनपटूची झलक श्रद्धामध्ये दिसत नसल्याने तिला या सिनेमातून बाहेर पडावं लागलं. सायनासारखं हुबेहूब वाटावं यासाठी मेहनत घेण्यासाठी किंवा तितकासा वेळ देण्याकरिता श्रद्धा तयार नव्हती अशाही चर्चा रंगल्या होत्या.
मात्र यावर पहिल्यांदाच अमोल गुप्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी सांगितले की, श्रद्धाला त्याचवेळी डेंग्यू झाला होता. उपचारासाठी ती हॉस्पिटलमध्ये होती.घरी अल्यानंतर तिला प्रचंड अशक्तपणा आला होता.
शूटिंग करण्यासाठी ती फिट नव्हती. म्हणून ऐनवेळी श्रद्धाच्या जागी परिणितीची निवड करण्यात आली. यावर मी कोणताच खुलासा केला नव्हता त्यामुळे वाद निर्माण झाल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचे अमोल गुप्ते यांनी सांगितले आहे.