जवळपास एक महिन्यानंतर रिया चक्रवर्तीला ड्रग्स प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून रिया जामीन मंजूर झाला आहे. मात्र तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. पुढील पाच अटींवर रियाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या आहेत त्या 5 अटी* रियाचा पासपोर्ट कोर्टात जमा करण्यात आला आहे. देशाबाहेर जर तिला जायचे असेल तर त्या आधी तिला कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागणार.
* रियाला 10 दिवस 11ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच NCB जेव्हा चौकशीसाठी बोलवले तेव्हा हजर रहावे लागले.
* जामीनासाठी रियाला 1 लाख रुपयांचा बॉन्ड भरावा लागाला आहे.
*रिया चक्रवर्ती जोपर्यंत कोर्टात प्रकरण सुरु आहे तोवर देशाबाहेर जाण्यास परवानगी नाही.
* रिया इतर अन्य साक्षीदारांना भेटण्यास मनाई आहे.
दोनदा झाली होती न्यायालयीन कोठडी वाढकोर्टाने रियाच्या न्यायालयीन कोठडीत दोनदा वाढ केली होती, त्यानंतर आता रियाला जामीन मंजूर झाला आहे. कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रिया, शोविक आणि मिरांडा यांच्यासह 5 जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
रियाला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा एनसीबीने म्हटले की समाजाला विशेष करून तरूणांना संदेश देण्याची गरज आहे की अमली पदार्थाचे सेवन करण्यापासून दूर रहा. जर त्यांनी असे केले तर त्यांनादेखील अशाच प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. 8 सप्टेंबरला एनसीबीने बरीच चौकशी केल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक केली होती. जर या प्रकरणात रिया चक्रवर्ती दोषी आढळली तर तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एनसीबीने ड्रग्स अँगलचा तपास करत आहे. एनसीबीला या तपासात पुरावे हाती लागले आहेत. आतापर्यंत एनसीबीने 17 जणांना अटक केली आहे