Join us

खऱ्या आयुष्यात चांगलीच हॉट आहे 'स्त्री'ची हडळ, पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 8:20 PM

‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटातील राजकुमार आणि श्रद्धा कपूरच्या अभिनयाची बरीच चर्चा झाली. पण यातील एक कलाकार मात्र बरीच दुर्लक्षित राहिली. होय, आम्ही बोलतोय ते या चित्रपटात हडळीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल. 

 राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली. अद्यापही या चित्रपटाची घोडदौड थांबलेली नाही. या हॉरर कॉमेडी चित्रपटातील राजकुमार आणि श्रद्धा कपूरच्या अभिनयाची बरीच चर्चा झाली. पण यातील एक कलाकार मात्र बरीच दुर्लक्षित राहिली. होय, आम्ही बोलतोय ते या चित्रपटात हडळीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल. ‘स्त्री’मध्ये त्या हडळीला सर्वच पाहण्यास उत्सुक होते. पण अखेरपर्यंत तिच्याबद्दल सन्पेन्स ठेवण्यात आला. हडळीची ही भूमिका श्रद्धाने साकारलीय, असाच प्रेक्षकांचा समज होता. पण प्रत्यक्षात अभिनेत्री फ्लोरा सैनीने हडळीची भूमिका साकारली आहे. फ्लोरा सैनी हे नाव बॉलिवूडप्रेमींसाठी काहीसे नवीन आहे. पण दाक्षिणात्य चित्रपटात हा चेहरा चांगलाच ओळखीचा आहे. तिने आतापर्यंत जवळपास ५०हून जास्त दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.ख-या आयुष्यात फ्लोरा चांगलीच हॉट आहे.

 ‘स्त्री’च्या मेकर्सनी जाणीवपूर्वक सोशल मीडियावर कुठेही ख-या ‘स्त्री’चा उल्लेख केला नाही. कारण प्रेक्षकांना चित्रपटातील ‘स्त्री कोणी दुसरीच असल्याचे माहिती पडले असते आणि चित्रपटातील एक सरप्राईज संपले असते. त्यामुळेचं जोपर्यंत चित्रपट प्रदर्शित होत नाही, तोपर्यंत माझी ओळख लपवण्यात आली, असे फ्लोराने सांगितले.

लवकरचं ‘स्त्री’चा सीक्वल येणार आहे. अलीकडे ‘स्त्री’चे निर्माते दिनेश विजान यांनी याबाबतचा खुलासा केला होता. ‘स्त्री’ चा सीक्वल येणार हे जणू ठरलेलेच होते. आम्ही फ्रॅन्चाईजी डोळ्यापुढे ठेवूनचं हा चित्रपट साकारला आहे. सीक्वल श्रद्धाची कहाणी आणि अशाच काही प्रश्नांची उत्तर देणारा असेल.

पुढील वर्षाच्या अखेरिसपर्यंत या चित्रपटाच्या सीक्वलचे शूटींग सुरू होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले होते. आता या सीक्वलमध्ये फ्लोराची पुन्हा वर्णी लागते की नाही, ते पाहुच.‘स्त्री’या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर याची कथा कर्नाटकातील ९० च्या दशकात घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. कर्नाटकच्या एका गावात रात्री एक हडळ फिरायची. ती रात्री लोकांच्या घराचा दरवाजा ठोठवायची आणि जो कुणी दरवाजा उघडायचा, त्याचा मृत्यू व्हायचा. यानंतर या भूतापासून वाचण्यासाठी लोकांनी आपल्या घराच्या भिंतींवर ‘स्त्री कल आन’ असे लिहिणे सुरू केले.

टॅग्स :राजकुमार रावश्रद्धा कपूर